Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Priya marathe death प्रिया मराठेचे पती कोण आहेत? जाणून घ्या तिच्या मालिका, सिनेमा अन् कुटुंबाबद्दल

Priya marathe death news who is Her husband : प्रसिद्ध टीव्ही मालिका 'पवित्र रिश्ता'च्या माध्यमातून कटुंबातील छोट्या बहिणीची समंजस भूमिका साकारुन घराघरात पोहचलेली मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे कर्करोगामुळे निधन झाले. प्रिया मराठेने अवघ्या ३८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तिच्या अचानक एक्झिटचे वृत्त धडकताच मराठी-हिंदी रसिकांना आणि चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आणि संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

Priya marathe death news who is Her husband

'पवित्र रिश्ता' आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांनी आपल्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिच्या निधनानंतर चाहत्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली. एवढ्या कमी वयात तिचे जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे लोक आता तिच्या लग्नाविषयी, पती आणि कुटुंबाबद्दल जाणून घेत आहेत.

प्रिया मराठे लढली कर्करोगाविरुद्ध जीवनाची लढाई

'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री प्रिया मराठे यांचे ३० ऑगस्ट रोजी कॅन्सरमुळे निधन झाले. त्या गेल्या अनेक दिवसांपासून या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. अखेर, त्यांनी आयुष्याची लढाई गमावली. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन जगतावर आणि त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

Priya marathe death news who is Her husband

प्रिया यांचे पती कोण आहेत, काय करतात?

प्रिया यांच्या निधनानंतर त्यांचे चाहते त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि विशेषतः पतीबद्दल जाणून घेऊ इच्छितात. प्रिया यांच्या पतीचे नाव शंतनु मोघे आहे. शंतनु हे लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे यांचे नातेवाईक आहेत. प्रिया आणि शांतनु यांनी २४ एप्रिल २०१२ रोजी प्रेमविवाह केला होता. शंतनु मोघे हे देखील प्रिया यांच्याप्रमाणेच मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे.

प्रिया मराठे यांना मुले आहेत का?

प्रिया आणि शंतनु यांच्या लग्नाला जवळपास १३ वर्षे झाली आहेत. सोशल मीडियावर ते दोघे अनेकदा त्यांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असत, जे त्यांच्यातील प्रेम दर्शवतात. शंतनु यांचा पत्नीच्या निधनानंतर त्यांच्यावर आभाळ कोसळले असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याला अजूनही मूलबाळ नव्हते. प्रियानेही तिच्या इंस्टाग्रामवर कधीही याबाबत कोणतीही बातमी किंवा फोटो शेअर केला नाही.

प्रिया मराठेविषयी थोडेसे...

  • प्रिया मराठे हिचा जन्म ठाणे येथे २३ एप्रिल १९८७ रोजी झाला होता. या सुखांनो या (२००६) ह्या मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत भूमिका करून आपल्या अभिनयास तिने सुरुवात केली होती.
  • या मालिकनंतर प्रियाने मागे वळून पाहिले नाही. विविध मराठी आणि हिंदी मालिका, 'कसम से', 'पवित्र रिश्ता', 'बडे अच्छे लगते है', 'चार दिवस सासूचे', 'तू तिथे मी', 'कॉमेडी सर्कस' इत्यादीत त्यांनी काम केले.
  • मराठी चित्रपट 'विघ्नहर्ता महागणपती' (२०१६) आणि 'किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी' (२०१६) मध्येपण तिने काम केले होते.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+