Popcorn Video : 1 थेंब तेल अन् मिठ फक्त 1 मिनिटांत दाण्यापासून बनला पॉपकॉर्न! 8 कोटींवर व्ह्युज
Popcorn Video : एका महिलेने पॉपकॉर्न बनवल्याचा व्हिडिओ 8 कोटींहून अधिक व्ह्यूज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. अवघ्या एकच मिनिटांत आणि एकच पॉपकॉर्न असा खास बनला की, हा व्हिडिओ तब्बल आठ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला. यामध्ये एक महिला कॉर्नच्या एका दाण्यापासून पॉपकॉर्न कसे बनवते ते पाहता येईल.
सोशल मीडियावर दररोज फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यांचे व्ह्यूज आणि लाईक्स हजारो आणि लाखात आहेत. कधी हे व्हिडिओ मजेदार असतात तर कधी ते तुम्हाला उत्साहाने भरून देतात. एकूणच, व्हिडिओ असे आहेत की ते तुम्हाला शेवटपर्यंत गुंतवून ठेवतात, ज्यामुळे व्हिडिओला व्ह्यू आणि लाईक्स मिळतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर आता या व्हिडिओची खूपच चर्चा होत असून खूप वेगाने व्हायरल होत आहे, ज्याची युजर्समध्ये खूप चर्चा होत आहे.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओ पाहिल्यास एक महिला एका तव्यावर पॉपकॉर्न बनवत आहे.तव्यावर फक्त एक पॉपकॉर्न दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती महिला पॉपकॉर्नवर तेलाचा एक थेंब आणि खूप कमी मीठ टाकते हे दिसतं. यानंतर ती एका लाकडी चमच्याने दाण्याला ढवळते. नंतर ती तो लाकडी चमचा वारंवार ढवळून मक्यावर ठेवते अन् काही वेळातच तो पॉपकॉर्न फुटतो. हा व्हिडीओ अगदी सामान्य आहे पण त्यावरचे व्ह्यूज लाखात नाही तर कोटीत आहेत.

व्हिडिओ इन्स्टावर झाला शेअर
महिलेचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 87 दशलक्ष किंवा 8.7 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 17 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहेत. युजर्सनी या व्हिडिओवर भरभरून कमेंटही केल्या आहेत.
व्हिडिओवर एक युजर्स म्हणाला की, तुम्ही पाॅपकाॅर्न बनवा तोपर्यंत मी कमेंट पाहतो...तर इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहिल्यानंतर आणखी एका यूजरने लिहिले की, "मला राग आला आहे, मी फक्त त्या छोट्या पॉपची वाट पाहत होतो." आणखी एका युजरने लिहिले की, नॉन-स्टिक पेजेसमधून किती चुका होत आहेत याची काळजी इतर कोणाला वाटत नाही का?












Click it and Unblock the Notifications