'पाकची सुरुवात..मोदीजी अंत करणार!'; ऑपरेशन सिंदूरवरील हे ढासू गाणं ऐकले का?, पाहा- VIDEO

Pawan Singh video Song On Operation Sindoor : पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर, 7 मे रोजी भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. यानंतर पाकिस्तानने भारताला युद्धासाठी चिथावणी देण्यास सुरुवात केली आहे.

दुसरीकडे संतापाचे वातावरण आहे. भारतीय लष्करही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे. सर्वजण सैन्याचे धैर्य आणि मनोबल वाढवत आहेत. चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटी देखील सैन्याला पाठिंबा देत आहेत. पण या सगळ्यात पवन सिंह यांनी वेगळ्या पद्धतीने भारतीय सैन्याचे व भारतीय नेतृत्वाचे कौतुक केले आहे. ऑपरेशन सिंदूरवर त्यांनी जे गाणे लिहिले आणि सादर केले त्याला खरच तोड नाही. हे गाणे ऐकून तुम्हाला देखील जोश निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. \

Pawan Singh video Song On Operation Sindoor

ऑपरेशन सिंदूरवर आधारित गाणं!

ऑपरेशन सिंदूरच्या 4 दिवसांनंतर पवन सिंहने एक गाणे बनवले आहे. जे या ऑपरेशनवर पूर्णपणे आधारित होते. हे व्हिडिओ गाणे पवन सिंह यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर आज रविवारी प्रसिद्ध झाले आणि त्या गाण्याचे धूमाकूळ घातला. हे गाणे रिलीज होताच टॉप 10 मध्ये ट्रेंडिंग करत आहे. हे गाणे पवन सिंग यांनी गायले आहे. त्याचे बोल छोटू यादव यांनी लिहिले आहेत आणि सरगम ​​आकाश यांनी संगीतबद्ध केले आहे.

गाण्याच्या सुरुवातीलाच पवन सिंह यांनी पंतप्रधान मोदींना आता पाकिस्तानला धडा शिकवण्याचे व पाकचे कंबरडे मोडण्याचे आवाहन करत आहे. ते म्हणाले, पाकिस्तानने सुरुवात केली आहे, मोदीजी तुम्ही ते पूर्णत्वास न्या, अमित शहाजी, जगातून दहशतवाद कमी करा, अशी साद त्यांनी घातली आहे.

सोशल मीडियावर पवन सिंगचे कौतुक

हे गाणे रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर पवन सिंहचे खूप कौतुक होत आहे. त्याची गाणी सर्वांना आवडत आहेत. एका वापरकर्त्याने त्याच्या गाण्याखाली कमेंट केली, जय हिंद, हे एक उत्तम गाणे आहे, पॉवर स्टारने ते पूर्ण भावनेने गायले आहे.

2 तासांत ट्रेंडिंगमध्ये हे गाणं टॉपवर आले आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, पवन सिंह हा भोजपुरीमधील एकमेव गायक आहे जो संस्कृती, सभ्यता आणि मूल्यांशी जोडलेल्या आपल्या आवाजाने देशातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयावर राज्य करतो, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+