जेव्हा परेश रावल यांची समस्या शरद पवार १० सेकंदात सोडवतात...
शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाचं नाव. गेल्या अनेक दशकांपासून शरद पवार या नावाने आपल्याभोवती राजकारण फिरवलं आहे. केवळ राजकारणचं नाही तर कला, क्रिडा, साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्येही पवारांच मोठं योगदान आहे. शरद पवारांचं क्रिकेटप्रेम तर जगाला ठाऊक आहे. शरद पवारांचे विरोधकांसोबतचे संबंधही स्नेहाचे आहे. विरोधकही त्यांच्याबद्दल आदरानेच बोलतात.
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा पवारांच कौतुक केलं आहे. दिवंगत नेते प्रणव मुखर्जी, मनमोहन सिंह, अरुण जेटली यांनीही अनेकवेळा पवारांच्या कामगिरीची उल्लेख करत त्यांचं कौतुक केलं होतं. केंद्र सरकारमधील आणखी एक महत्त्वाचे मंत्री म्हणजे नितीन गडगरी सुद्धा अनेकदा पवारांवर स्तुतीसुमनं उधळतात. आता एवढं सगळं सांगायचं कारण असं की प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनी शरद पवारांचा एक किस्सा सांगितला आहे.

लल्लनटॉप या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनी शरद पवारांचं दिल्लीतील वजनं किती होतं हेच सांगून टाकलं. परेश रावल नेमकं काय म्हणाले हे या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मी ऋतुजा, वनइंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे.
सिनेसृष्टी असो इतर कुठलंही क्षेत्र. या क्षेत्रातील अनेक मंडळी कुठल्या ना कुठल्या कारणाने शरद पवारांना भेटत असतात. काही समस्या असेल ती पवारांपुढे मांडतात. ती समस्या शरद पवार काही मिनिटात सोडवतात असा अनुभव आजवर अनेकांना आलाय. याचीच प्रचिती अभिनेते परेश रावल यांनाही आली. शरद पवारांच्या याच भेटीचा किस्सा परेश रावल यांनी लल्लनटॉप या चॅनेलशी बोलताना सांगितला.
परेश रावल म्हणाले की, नाटकांवरील जीएसटीचा प्रश्न बरेच दिवस सुटत नव्हता. आपण या प्रश्नाबाबत शरद पवार यांना विनंती केली आणि अवघ्या दहा सेकंदात शरद पवारांनी प्रश्न सोडवला. हा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार आणि आम्ही तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती. पवारांचा शब्द जेटलींना टाळला नाही आणि आज देशातील नाट्यसृष्टी शरद पवार यांच्या एका शब्दामुळं जीएसटीतून मुक्त आहे, असं परेश रावल यांनी या मुलाखतीत सांगितलं.
या किस्स्याबाबत सांगताना परेश रावल पुढे म्हणतात, मी मुद्दाम शरद पवार यांना एक प्रश्न विचारला की, पवार साहेब ही तर तुमची व्होट बँक नाही, तरीही तुम्ही प्रश्न सोडवला. यावर शरद पवार म्हणाले की, हे मी कला आणि संस्कृतीसाठी केलंय. ही दादागिरी आहे त्यांची, ही मराठी लोकं आहेत अशा शब्दांत परेश रावल यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचं कौतुक केलं.
सध्या परेश रावल यांच्या लल्लनटॉपवरील या मुलाखतीचा भाग सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही हा व्हिडिओ शेअर केलाय.












Click it and Unblock the Notifications