सिद्धार्थ-जान्हवीच्या 'परम सुंदरी'ची 'अॅडव्हान्स बुकिंग'मध्ये कशी कामगिरी, कथेत किती आहे दम?
Param Sundari Advance Booking Update : सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांचा बहुचर्चित चित्रपट 'परम सुंदरी' लवकरच 29 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा होईल, अशी अपेक्षा निर्मात्यांना होती, पण तसं काहीच घडलं नाही. आतापर्यंतच्या 'अॅडव्हान्स बुकिंग'ने निर्मात्यांची चिंता वाढवली आहे. दुसऱ्या एका मोठ्या चित्रपटाची भीती असल्यामुळे निर्मात्यांनी 'परम सुंदरी'ची रिलीज डेट बदलली होती. आता निर्मात्यांना आशा आहे की, चित्रपट पहिल्या दिवशी तरी चांगली कमाई करेल.

'परम सुंदरी'ची कथा आणि प्रेक्षकांची उदासीनता
'परम सुंदरी' हा एक रोमँटिक चित्रपट असून, यात एका उत्तर भारतीय मुलाची आणि एका दक्षिण भारतीय मुलीची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा 'चेन्नई एक्सप्रेस'सारखीच असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
व्यापार विश्लेषकांच्या मते, जर या चित्रपटाची कथा दमदार, नवीन आणि वेगळी नसेल, तर तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरू शकतो. सध्या तरी या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये फारशी उत्सुकता दिसून येत नाहीये. बुक माय शो वर केवळ १ लाख ६१ हजार लाईक्स मिळाल्यामुळे चित्रपटाची फारशी चर्चा नसल्याचं दिसून येतं.
'अॅडव्हान्स बुकिंग'ची निराशाजनक आकडेवारी
पिंकव्हिलाच्या अहवालानुसार, 'परम सुंदरी'ने आतापर्यंत फक्त तीन राष्ट्रीय साखळ्यांमध्ये १२,००० तिकिटांची विक्री केली आहे, जी खूपच कमी आहे. चित्रपट रिलीज व्हायला अजून एक दिवस बाकी असल्यामुळे ही संख्या ५०,००० पर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
मात्र, 'अॅडव्हान्स बुकिंग'च्या बाबतीत हा चित्रपट खूपच मागे आहे. या कमी प्रतिसादामुळे निर्मात्यांच्या अपेक्षा कमी झाल्या आहेत, म्हणूनच त्यांनी रिलीजच्या दिवशीच प्रेस शो ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या चित्रपटातून पहिल्यांदाच सिद्धार्थ आणि जान्हवीची जोडी मोठ्या पडद्यावर येत आहे. तुषार जलोटा दिग्दर्शित 'परम सुंदरी' प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी होतो का, हे पाहण्यासाठी 29 ऑगस्टपर्यंत वाट बघावी लागेल.












Click it and Unblock the Notifications