Oscars 2025 Predictions: हे असतील यंदाचे ऑस्कर विजेते, तुमच्या आवडत्या चित्रपटांचा यादी घ्या जाणून
Oscars 2025 Predictions : ऑस्कर पुरस्कार जागतिक मनोरंजन क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार या पुरस्काराचा जंगी रंगारंग कार्यक्रम अमेरिकेच्या वेळेनुसार 2 मार्च रोजी रात्री 8 वाजता सुरू होईल. त्याच वेळी, भारतात 3 मार्च रोजी सकाळी साडेपाच वाडेपासून थेट पाहता येणार आहे. Jio Hotstar वर हा कार्यक्रम पाहू शकता, जर तुमच्याकडे त्याचे प्रीमियम सदस्यत्व असेल तर... टीव्हीवर तुम्ही ते स्टार मूव्हीज चॅनलवर थेट पाहू शकाल.
एकापेक्षा एख सरस चित्रपटांना नामांकन
वनइंडिया हिंदीनुसार, यावेळी एकापेक्षा एक सरस चित्रपटांना ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. यामध्ये 2024 साली प्रदर्शित झालेल्या एमिलिया पेरेझ, अनोरा, द ब्रुटालिस्ट आणि कॉन्क्लेव्ह या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. सीन बेकर, ब्रॅडी कॉर्बेट आणि जेम्स मँगॉल्ड यांचीही नावे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या यादीत आहेत.

कोणते चित्रपट आणि कलाकार जिंकू शकतात ऑस्कर?
सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या श्रेणीत 10 नावांचा समावेश असल्याचे आश्चर्यकारक गोष्ट प्रथमच समोर आली आहे. त्यात ड्युनः पार्ट 2, द ब्रुटालिस्ट आणि एमिलिया पेरेझ यांच्यात मोठी स्पर्धा आहे. एमिलिया पेरेझला या प्रकारात पुरस्कार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीमध्ये, द ब्रुटालिस्टसाठी ॲड्रिन ब्रॉडी आणि अ कम्प्लीट अननोनसाठी नामांकन मिळालेले टिमोथी चालमेट यांच्यात स्पर्धा आहे. त्याचवेळी, एमिलिया पेरेझच्या कार्ला सोफिया गॅस्कोन आणि सिंथिया एरिव्हो (विक्ड) यांच्यात पुरस्कारासाठी चुरस आहे.
आता सर्वाधिक 13 नामांकने मिळालेला एमिलिया पेरेझ मुव्ही हा पुरस्कार जिंकतो की 8 नामांकने मिळालेल्या कॉन्क्लेव्हमध्ये बाजी मारतो हे लवकरच समजेल. या सर्व प्रश्नांसाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
भारत आणि ऑस्कर
भारताकडून अधिकृतपणे ऑस्करसाठी किरण रावच्या मिसिंग लेडीज हा सिनेमा पाठवण्यात आला होता. मात्र या शर्यतीच्या पहिल्याच फेरीत तो बाहेर पडला. चित्रपट निर्मात्या पायल कपाडियाचा चित्रपट ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपट वगळता सर्व श्रेणींमध्ये येथे पाठविण्यात आला. मात्र कोणत्याही श्रेणीत नामांकन होऊ शकले नाही. मात्र, या चित्रपटाने जगभरातील अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये रंगत आणली. कान्समधील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कारही या चित्रपटाला मिळाला होता.
भारताला संधी काय?
आता ऑस्कर 2025 मध्ये भारताची एक आशा अनुजा या चित्रपटाकडून आहे. याला लघुपट श्रेणीत नामांकन मिळाले आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. याची निर्मिती गुनीत मोंगा यांनी केली आहे. मात्र, या चित्रपटाने काय साध्य केले हे 3 मार्चला कळेल.












Click it and Unblock the Notifications