Oscar 2025 : 'अनुजा'चे ऑस्कर' पुरस्काराचे स्वप्न भंगले! प्रियंका चोप्राची फिल्म स्पर्धेतून बाहेर!
Oscar 2025 Priyanka Chopra Guneet Monga's film Anuja misses out : ऑस्कर 2025 म्हणजेच 97 वा अकादमी पुरस्काराचा रंगारंग सोहळा अमेरिकेतली लाॅन्स एंजलिस येथे सुरु आहे. अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार 2 मार्च 2025 रोजी तर भारतीय प्रमाणवेळेनुसार 3 मार्च 2025 सकाळी हा कार्यक्रम पाहिला जात आहे. त्यातच आता भारतासाठी एक मोठी बातमी आली आहे.
ऑस्कर पुरस्काराच्या रेसमधून प्रियंका चोप्राची फिल्म 'अनुजा' ही फिल्म बाहेर पडली आहे. त्यामुळे भारतीयांचा हिरमोड झाला आहे. ऑस्कर पुरस्कारासाठी 'अनुजा'ने लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीत आपले स्थान निर्माण केले होते. आता या चित्रपटाला पुरस्कार मिळण्याची संधी मात्र हुकली आहे.

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे ऑस्कर विजेत्याची घोषणा होत आहे. यंदा 'अनुजा' भारताला ऑस्कर मिळवून देऊ शकेल, अशी अपेक्षा होती. पण भारताचे हे स्वप्न आता भंगले आहे. 2023 साली 'द एलिफंट व्हिस्पर्स'साठी ऑस्कर पुरस्कार जिंकणारा भारतीय चित्रपट निर्माता गुनीत मोंगा यांच्या 'अनुजा' चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. हा चित्रपट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीमध्ये समाविष्ट करण्यात आला होता. पण आता हा चित्रपट स्पर्धेतून बाद झाला आहे. आय ॲम नॉट अ रोबोट या चित्रपटामुळे अनुजाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
'अनुजा' चित्रपटाबद्दल थोडेसे..
गुनीत मोंगा व्यतिरिक्त अभिनेत्री प्रियांका चोप्राचेही 'अनुजा'सोबत कनेक्शन आहे. प्रियांका चोप्रा भारतीय-अमेरिकन चित्रपट 'अनुजा' ची कार्यकारी निर्माती आहे. अनुजा चित्रपटाची कथा दिल्लीतील एका 9 वर्षांच्या मुलीची कथा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ॲडम जे ग्रेव्हज यांनी केले आहे. या लघुपटाची कथा एका 9 वर्षांच्या मुलीभोवती केंद्रित आहे. ही 9 वर्षांची मुलगी तिच्या मोठ्या बहिणीसोबत एका कारखान्यात काम करते. मुलीला तिच्या अभ्यासादरम्यान काम करण्यास भाग पाडले जाते, अशी थोडक्यात या फिल्मची स्टोरी आहे.
कुठे सुरु आहे सोहळा?
लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. तुम्ही ते स्टार मूव्हीज आणि जिओ हॉटस्टारवर 3 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 5:00 वाजेपासून थेट प्रक्षेपण सुरु आहे. यावेळी, चित्रपटांचा सर्वात मोठा पुरस्कार शो प्रसिद्ध कॉमेडियन आणि पॉडकास्टर कॉनन ओ'ब्रायन होस्ट करत आहे. त्याने नुकतेच भारतीयांसाठी खास गोष्ट सादर केली असून भारतीय सध्या ऑस्करसोबत नाश्ता करत आहेत असे वक्तव्य करत हिंदीतून तो बोलला, यामुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्काही बसला.












Click it and Unblock the Notifications