Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

70 वर्षीय अभिनेत्याचे 30 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत बोल्ड सीन, फिल्मचा ट्रेलर पाहून चाहतेही संतापले

Kamal Haasan News : सुपरस्टार कमल हसन त्यांचा आगामी सिनेमा 'ठग लाईफ' (Thug Life) मुळे चर्चेत आले आहेत. नुकताच 'ठग लाईफ'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलरला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. पण, ट्रेलर रिलीज होताच कमल हसन मात्र फार सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत.

एकीकडे कमल हसन आणि चित्रपट निर्माते मणिरत्नम यांची जोडी पुन्हा एकत्र आल्यामुळे चाहत्यांंना आनंद आहे. मात्र, दुसरीकडे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही सीनमुळे मात्र चाहत्यांचा संताप देखील पाहायला मिळत आहे.

70 वर्षीय अभिनेता कमल हसन यांचा अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबतचा रोमँटिक सीन, जो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे. रेडिटवरील एका युजरनं कमल हासन आणि त्रिशा कृष्णन यांच्या ट्रेलरमधील एका रोमँटिक दृश्याचा स्क्रीनशॉट शेअर केला. दुसऱ्या एका फोटोमध्ये कमल हासन अभिनेत्रीला किस करताना दिसत आहे.

kamal haasan lip lock

"नहीं भगवान प्लीज नो...", चाहत्यांचा संताप

एका युझर्सने शेअर केलेल्या स्क्रिनशॉर्टसोबत एक कॅप्शन लिहिलं आहे. युजरनं लिहिलंय की, "नहीं भगवान प्लीज नो..." सिनेमातील लीड अभिनेता कमल हसन 70 वर्षांचे आहेत. तर त्रिशा 42 वर्षांची आहे. अशातच या दोघांमध्ये इंटिमेट सीननं सर्वांची झोप उडवली आहे. नेटकरी प्रचंड चिडले असून त्यांनी कमल हसन यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

kamal haasan lip lock

एका युझरने "त्रिशा, श्रृती हसनपेक्षा फक्त तीन वर्षांनी मोठी आहे.", तर आणखी एका युजरनं लिहिलंय की, "फक्त 30 वर्षांचं अंतर आहे.", पुढे एका युजरनं लिहिलंय की, "अभिरामी आणि कमल हसन यांच्यात 30 वर्षांचं अंतर लिप लॉक शेअर करताना पाहणं विचित्र वाटत असल्याचे म्हटले आहे.

ठग लाईफ चित्रपटाची काय आहे स्टोरी?

ठग लाईफबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यात कमल हसन आणि सिलंबरासन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट एका गँगस्टरच्या प्रवासावर आधारित आहे, जो एका लहान मुलाला गुन्हेगारीच्या जगात मार्गदर्शन करतो. जसजशी वर्ष जातात, तसतसा सिलंबरसननं साकारलेला मुलगा एक विश्वासू साथीदार बनतो.

ट्रेलरमध्ये गँगस्टर ड्रामा दाखवण्यात आला आहे. तर त्रिशा कृष्णन, सान्या मल्होत्रा, अभिरामी, अशोक सेल्वन, ऐश्वर्या लक्ष्मी, जोजू जॉर्ज, नासेर, अली फजल, पंकज त्रिपाठी, रोहित सराफ आणि वैय्यापुरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+