Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

VIDEO- उदीत नारायण गायक आहेत की हाँलिवूडचे हिरो..? लाईव्ह काँन्सर्टमध्ये तरुणीला केलं किस

प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उदित नारायण लाईव्ह शोमध्ये महिला चाहत्यांना किस करतानाना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी चांगलेच संतापले. लाईव्ह शोमध्ये गाणं गातानाचा उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना किस केलं. इतकंच नाही, तर तिच्या ओठांचं चुंबन घेतलंय. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

Udit Narayan

नेमकं काय झालं?

सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उदित नारायण लाईव्ह शोमध्ये 'टीप टीप बरसा पाणी' हे गाणं म्हणताना दिसत आहेत. यावेळी गाणं म्हणता-म्हणता उदित नारायण समोर उपस्थित असलेल्या महिला चाहत्यांच्या गालावर किस करतात. इतकंच नाही, तर त्यांनी एका तरुणीला जबरदस्तीने ओठावर किस केले. हाच लीप लाँक किसचा व्हिडीओ व्हायरल झालाय. उदित नारायण सध्या 69 वर्षांचे आहेत. यांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली.

काय आहे व्हिडीओत?

व्हायरल व्हिडीओमध्ये उदित नारायण टिप-टिप बरसा पाणी गाणं गाताना आणि महिलांना किस करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये उदित नारायण यांच्या परफॉर्मन्सवेळी चाहते त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी स्टेज जवळ येताना दिसत आहे. यावेळी उदित नारायण खाली वाकून फॅन्ससोबत फोटो काढतात. दरम्यान, फोटो काढताना ते महिलांच्या गालावर किस करतात. त्यानंतर आणखी एक महिला फोटो काढताना त्यांनी तिच्या ओठांवर किस करताना स्पष्ट दिसत आहे.

नेटकऱ्यांचा संताप

उदित नारायण यांच्या या व्हायरल व्हिडीओवरुन आता नेटकरी संतापले आहेत. सोशल मीडियावर उदित नारायण यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत व्हिडीओवर कमेंट करत आहेत. याशिवाय, हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर आणि रिशेअर केला जात आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहता-पाहता व्हायरल झाला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+