हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशा नवीन प्रेमाच्या शोधात, म्हणाली- 'योग्य वेळी नातेसंबंध
Natasa Stankovic: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांच्यात गेल्या वर्षी 2024 मध्ये घटस्फोट झाला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून वेगळे होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता नताशा पुन्हा प्रेमाच्या शोधत आहे. तिला विश्वास आहे की योग्य वेळी योग्य व्यक्तीची भेट होणे हे घडते. याबाबत स्वत:नताशा खुलासा केला आहे .
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नताशा स्टॅन्कोविकने तिच्या नुकत्याच साजरा झालेल्या वाढदिवसाबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली की तो एक खास आणि संस्मरणीय दिवस होता. नताशाने दिवसभर तिचा मुलगा अगस्त्यसोबत चांगला वेळ घालवला आणि संध्याकाळी जवळच्या मित्रांसोबत एक छोटी पार्टी केली. वाढदिवसाचा दिवस हा संपूर्ण प्रेम आणि आनंदाने भरलेला होता, असं तिने म्हटलं आहे.

दरम्यान नताशाने 2024 या वर्षाबद्दल ही भाष्य केलं आहे. ति म्हणाली की, "गेले वर्ष आव्हानांनी भरलेले होते, मी त्याबद्दल कृतज्ञ आहे. आव्हानांमधून जाताना आपण शहाणे होतो आणि मला ते आवडते. मला खूप वेगवेगळे अनुभव आले. मी प्रेमात पडण्याच्या विरोधात नाही. आयुष्यात जे काही येते ते मला स्वीकारायचे आहे. योग्य वेळ आल्यावर योग्य नातेसंबंध आपोआप घडतात यावर माझा विश्वास आहे, असं तिने म्हटलं आहे.
प्रेमाबद्दल नताशाचे विचार
नताशा हार्दिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर आता ती नवीन प्रेमासाठीही तयार आहे. ती म्हणाली की "मी प्रेमात पडण्यास अजिबात संकोच करत नाही. आयुष्यात जे काही येईल ते मी स्वीकारू इच्छिते. योग्य नाते योग्य वेळी घडते यावर माझा विश्वास आहे," असं तिने म्हटलं आहे.
नताशा पुढे म्हणाली की, तिच्यासाठी कोणत्याही नात्यात विश्वास आणि समजूतदारपणा महत्त्वाचा आहे. तिला प्रेमला तिच्या आयुष्याचा एक सुंदर भाग असल्याचं मानते, पण तिला वाटते की, त्यामुळे तिचा प्रवास आणखी चांगला व्हावा. ती म्हणाली, मी अशा नात्यांचे कौतुक करते जे समजूतदारपणा आणि विश्वासावर आधारित असतात.
हार्दिक आणि नताशाने वेगळे होण्याची घोषणा केली
नताशा स्टॅन्कोविच आणि हार्दिक पांड्या यांनी 18 जुलै रोजी इंस्टाग्रामवर एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून चार वर्षांच्या लग्नानंतर वेगळे झाल्याची घोषणा केली. त्यांनी हा एक कठीण निर्णय असल्याचे वर्णन केले. तसेच त्यांनी लोकांना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांचा घटस्फोट का झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications