'अभिनेता नसतो तर अंडरवर्ल्डमध्ये असतो! कधी कधी माझा हात उठतो..' नाना पाटेकर असं का बोलले? घ्या जाणून
Nana Patekar Interview : खर्ज स्वरातील शब्द...थेट आणि टोकदार शब्दांचा मारा अन् समोरच्याला शब्दातूनच गार करणारे 'नटसम्राट' नाना..होय नाना पाटेकर यांच्याविषयी आपण एक गोष्ट जाणून घेत आहोत. "अभिनेता नसतो तर अंडरवर्ल्डमध्ये असतो. मी खूप व्हायलेंट होतो पण आता नाही, जर आताही खूपच काही झाले तर हात उठतो" असे विधान नाना पाटोकर यांनी केले आहे.
नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान नाना पाटेकर यांनी हे वक्तव्य केले, यासह कबूल केले की ते स्वभावाने खूप रागीट आहेत.

मी आधी खूप व्हायलंट होतो
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी खुलासा केला आहे की, ते व्हायलंट होतो आणि त्यांनी अनेकांना मारहाणही केली आहे. नाना पाटेकर म्हणाले, "जर मी अभिनेता बनलो नसतो, तर मी अंडरवर्ल्डमध्ये असतो. मी गंमत करत नाही, मी याबाबत खूप गंभीर आहे. अभिनयाने मला एक आउटलेट दिला. माझा राग काढण्याचा हा एक मार्ग अभिनय बनला आहे.
अनेक लोकांवर हात उचलले
नाना पाटेकर पुढे म्हणाले, 'ते अनेक लोकांशी लढलो आहे आणि मी अनेक लोकांवर हात उचलले आहे. यापैकी अनेकांची नावे मला आठवत नाहीत. चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्यासोबतच्या संघर्षाची आठवण करून देताना ते म्हणाले, "संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची अजूनही शक्यता आहे, पण मी ज्याप्रकारे त्यांच्यावर ओरडलो, ते पाहून कदाचित त्यांना वाईट वाटले असेल. त्यानंतर आम्ही दोघांनी एकत्र काम केले नाही.
संजय लिला भन्साळीबाबत वक्तव्य
"नाना पाटेकर म्हणाले की ते भन्साळींसोबत काम करण्यासंदर्भात मी 'मिस' करत आहे पण अडचण ही आहे की ते कधीकधी मी खूप कठोर शब्द वापरतो, यामुळे भन्साळी नाराज झाले असतील.
नानांनी असेही सांगितले की, त्यांनी भन्साळींसोबत कधीही काहीही स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही, ते म्हणाले की, जर आम्ही एकमेकांना इतके दिवस ओळखत आहोत, तर मग छोट्या छोट्या गोष्टींचा खुलासा करण्याची काय गरज आहे? "मला यात माझी चूक वाटत नाही. बघू, वेळ आल्यावर सोडवू."
वनवासमध्ये भुमिका
चित्रपटाविषयी बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, ते लवकरच त्यांच्या आगामी चित्रपट वनवासमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट गदर 2 चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे, ज्यामध्ये उत्कर्ष शर्मा, राजपाल यादव आणि सिमरत कौर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.












Click it and Unblock the Notifications