Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नागा चैतन्य-शोभिता धुलीपाल आज विवाह बंधनात अडकणार, 8 तास चालणार विधी,या खास पाहुण्याची लग्नाला हजेरी

Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding: दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य आज शोभिता धुलिपालासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाच्या विधी सुरू झाल्या आहेत. लग्न विधीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

साऊथचा प्रसिद्ध अभिनेता नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य याचे हे दुसरे लग्न आहे. याआधी त्यांनी दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत लग्न केले होते. मात्र वैयक्तिक कारणांमुळे दोघांचा घटस्फोट झाला आहे.

naga chaitanya and sobhita

फोटो सौजन्य- पीटीआय

नागा चैतन्य-शोभिता धुलिपाला यांचा आज विवाह

आज 4 डिसेंबर 2024 रोजी नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्नगाठ बांधणार आहे. प्रतिष्ठित अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये हे जोडपे सात फेरे घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून नागा आणि शोभिताच्या लग्नाआधीचे विधी केले जात आहेत. ज्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शोभिता-नागाचे लग्न 8 तास चालणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार शोभिता धुलीपालाच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, तेलुगू ब्राह्मण परंपरेनुसार शोभिता आणि नागा यांच्या लग्नाचे विधी 8 तासांपेक्षा जास्त काळ चालतील. हा विवाह पारंपारिक पद्धतीने पार पडणार आहे.

हे खास पाहुणे विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्न समारंभात सहभागी होणाऱ्या खास पाहुण्यांची यादीही समोर आली आहे. या विवाह सोहळ्याला अभिनेता अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासह उपस्थित राहणार आहे. याशिवाय एनटीआरसह चिरंजीवी, रामचरण आणि उपासना, महेश बाबू आणि नम्रता, प्रभास, एसएस राजामौली, पीव्ही सिंधू, नयनतारा, अक्किनेनी कुटुंब आणि दग्गुबती कुटुंबही या खास लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

कुठे होणार नागा आणि शोभिताचं लग्न?

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा विवाह अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये होत आहे. अन्नपूर्णा स्टुडिओशी नागा चैतन्यच्या कौटुंबिक वारसाशी खोल संबंध आहे. नागा चैतन्यचे आजोबा अक्किनेनी नागेश्वर राव यांनी 1976 मध्ये या स्टुडिओची स्थापन केलेली आहे. बंजारा हिल्समधील ही 22 एकर इस्टेट दीर्घकाळापासून सिने प्रतिभा आणि कौटुंबिक अभिमानाचे प्रतीक आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+