दीपिकानेच मला प्रपोज केलं होतं, आम्ही रिक्षातून फिरायचो; प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या 'स्पिरिट' या चित्रपटामुळे चर्चेत असतानाच, तिच्या वैयक्तिक आयुष्यातील जुन्या गोष्टी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अभिनेता आणि मॉडेल मुजम्मिल इब्राहिमने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत दीपिकासोबतच्या नात्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

deepika muzzamil relationship

मुजम्मिलने सांगितले की, दीपिका आणि तो एकेकाळी प्रेमसंबंधात होते आणि त्यांचे नाते तब्बल दोन वर्षे टिकले. विशेष म्हणजे, त्यांनी हेही उघड केलं की दीपिकानेच सर्वप्रथम त्याच्यावर प्रेम व्यक्त करत त्याला प्रपोज केलं होतं. "ती खूप गोड आणि सोज्वळ मुलगी होती.

आम्ही आमच्या मॉडेलिंगच्या काळात एकमेकांच्या संपर्कात आलो. टॉमी हिलफिगरच्या शोदरम्यान आमची भेट झाली. तिने मला 'ग्लॅड्रॅग्स' आणि इतर कामांमधून पाहिलं आणि ती माझ्याकडे आकर्षित झाली," असं तो म्हणाला.

मुजम्मिल इब्राहिमने हेही स्पष्ट केलं की, दीपिका मुंबईत आल्यावर तिला सर्वात आधी भेटणारा तोच होता. "ती मुंबईत नवखी होती आणि मी तेव्हा अभिनयात नाव कमावलं होतं. आमचं नातं माझ्यासाठी पहिलं गंभीर रिलेशनशिप होतं. तिनं मला प्रपोज केलं आणि सुरुवातीला सगळं छान सुरू होतं. मात्र, काही कारणांमुळे नंतर मीच तिला सोडलं. त्याचा मला पश्चात्ताप नाही," असं तो ठामपणे म्हणाला.

ब्रेकअपनंतर काही काळ दोघांमध्ये दुरावा होता, पण त्यानंतर ते परत एकमेकांच्या संपर्कात आले होते. "आमचं ब्रेकअप झाल्यावर लगेच आम्ही मित्र झालो असं नाही. पण काही वर्षांनी एकमेकांना बोलायला लागलो. ती रणवीरसोबत लग्न करणार होती, त्याआधीपर्यंत आमचं अधूनमधून बोलणं चालू होतं. आम्ही नेहमीच एकमेकांच्या यशाबद्दल अभिनंदन करत असू," असंही मुजम्मिलने सांगितलं.

त्यानं काही आठवणीही शेअर केल्या. "पावसाळ्यात आम्ही रिक्षातून फिरायला जायचो. एकदा रिक्षावाल्याला तिनं आवडलेलं गाणं वाजवायला सांगितलं आणि तो तेच गाणं दीड तास सतत वाजवत राहिला. ती खूप खुश होती," अशा जुन्या आठवणींना त्याने उजाळा दिला.

दरम्यान, दीपिका पादुकोण आज बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 2018 मध्ये ती अभिनेता रणवीर सिंहशी विवाहबद्ध झाली. 2024 मध्ये तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, सध्या ती आपल्या अभिनय कारकिर्दीबरोबरच आईपणही समर्थपणे निभावत आहे. तिच्या नावावर अनेक हिट चित्रपट असून, ती देश-विदेशात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. स्पिरीट चित्रपटामुळे दीपिका आता पुन्हा चर्चेत आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+