Munnabhai 3 Update : मुन्नाभाई -3 बाबत मोठी अपडेट! अर्शद वारसीचा संजय दत्तसंदर्भात 'हा' खुलासा

Munnabhai 3 Update : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक जोडी असलेल्या मुन्नाभाई आणि सर्किटला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची आस लावून बसलेल्या चाहत्यांसाठी'सर्किट' ची भूमिका साकारणारा अभिनेता अर्शद वारसी याने नुकताच खुलासा केला आहे की, दिग्दर्शक राजकुमार हिरानी 'मुन्नाभाई ३' वर सक्रियपणे काम करत आहेत. त्यामुळे हा आयकॉनिक चित्रपट लवकरच प्रत्यक्षात येण्याची आशा पुन्हा पल्लवित झाली आहे.

Munnabhai 3 Update

अभिनेता अर्शद वारसीने नुकताच खुलासा केला आहे की, दिग्दर्शक राजकुमार हिरानी या प्रोजेक्टवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहेत. संजय दत्तच्या 'मुन्नाभाई'ला विसरू न देणारा, प्रत्येक संकटात साथ देणारा हा 'सर्किट' आता नक्की कोणत्या 'जादू की झप्पी'ची बातमी घेऊन आला आहे? जाणून घ्या...

अर्शद वारसीचा महत्त्वाचा खुलासा

'स्क्रीन'ला दिलेल्या एका मुलाखतीत अर्शद वारसीने संजय दत्तसोबत काम करण्याच्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, "संजू अविश्वसनीय आहे, तो पूर्णपणे वेगळ्या प्रकारची प्रतिभा आहे. त्याच्यासोबत असण्यात खूप मजा यायची." अर्शदने गंमतशीरपणे सांगितले की, संजय दत्तला दररोज सीन आठवण्यासाठी त्याला संपूर्ण स्क्रिप्ट तोंडपाठ करावी लागत असे.

राजकुमार हिरानींची सक्रियता

'मुन्नाभाई ३' च्या विकासाबाबत बोलताना अर्शद वारसीने मोठा खुलासा केला. तो म्हणाला की, एक वेळ अशी होती जेव्हा हा चित्रपट होणे शक्य वाटत नव्हते, पण आता राजकुमार हिरानी हे चित्रपट बनवण्यासाठी गंभीरपणे वचनबद्ध आहेत. यापूर्वी, हिरानी यांनी योग्य कथा मिळाल्यास तिसरा चित्रपट बनवण्याचा इरादा व्यक्त केला होता.

चाहत्यांमध्ये उत्साह

संजय दत्तचा 'मुन्नाभाई' आणि अर्शद वारसीचा 'सर्किट' ही पात्रे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक पात्रांपैकी आहेत. या दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री हे या चित्रपटांच्या यशाचे सर्वात मोठे कारण ठरले आहे.

विनोद आणि भावनांचा योग्य मिलाफ साधणाऱ्या या चित्रपटांमुळे 'मुन्नाभाई' सिरीज प्रेक्षकांची सर्वकालीन आवडती बनली आहे. आता राजकुमार हिरानी पुन्हा एकदा या प्रकल्पाचे नेतृत्व करत असल्याने, चाहत्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. 'मुन्नाभाई ३' चा प्रवास लांब आणि अनिश्चित असला तरी, ताज्या घडामोडींमुळे हा चित्रपट लवकरच पडद्यावर येण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+