'मुनावर फारुकी हॅबीच्यूअल! आम्हीही त्याच्या कानाखाली मारु, मग स्वाॅरी म्हणू - 'या' नेत्याचा इशारा
मुंबई - लाथो के भूत बातो से नही मानते असा बिग बाॅस सीजन १८ चा विजेता आणि विनोदी कलाकार मुनावर फारुकी आहे. तो हॅबीच्यूअल आहे. तो आधी गुन्हा करतो आणि मग साॅरी म्हणतो. आम्हीही त्याच्या कानाखाली मारु नंतर स्वाॅरी म्हणू असा इशारा भाजप नेते नितेश राणे यांनी दिला आहे, ते आज एनआय वृत्तसंस्थेशी बोलत होते.
मुनावर फारुकी याने अलिकडेच कोकणी माणसांबद्दल केलेले वक्तव्यावरुव वादंग निर्माण झाले होते. त्यानंतर मुनावर विरोधात कोकणातील नेते नितशे राणे हे आक्रमक झाले होते. त्यानंतर त्याला इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर मुनावरने माफीही मागितली होती पण प्रकरण एवढ्यावर आता थांबण्याचे नाव घेत नाही.

काय म्हणाले नितेश राणे?
मुनवर फारुकी यांच्या कोकणी लोकांबद्दलच्या कथित वक्तव्यावर भाजप नेते नितीश राणे म्हणतात, "तो एक सवयीचा गुन्हेगार आहे... एकदा त्यांनी हिंदू समाजातील लोकांबद्दल आणि नंतर भगवान रामाबद्दल काहीतरी चुकीचे बोलले आणि नंतर त्याबद्दल माफी मागितली होती."
#WATCH | On Munawar Faruqui's reported comment on Konkani people, BJP leader Nitesh Rane says, " He is a habitual offender...once he said something wrong about people of Hindu community and then about Lord Ram and later he said sorry for it. Now he spoke about Konkan people and… pic.twitter.com/0zg9xb4b6K
— ANI (@ANI) August 14, 2024
आम्हीही कानाखाली मारु शकतो..
नितेश राणे म्हणाले, "यापुर्वी त्याने एक वक्तव्य केले. त्याची माफी मागितली ठीक पण पुन्हा त्याने आपले मत व्यक्त केले आहे." कोंकणी माणसांबद्दल वक्तव्य केल्यानंतर आपण माफी मागितली असे तो सांगतो. म्हणजे आधी चूक करायची आणि माफी नंतर मागायची. जर असे असेल तर आम्हीही त्याला आधी कानाखाली मारु आणि नंतर माफी मागू."
मुनावरने नेमकं काय केलं होतं?
मुनावर फारुकी हा एक स्टँडअप कॉमेडियन आहे. गेल्या आठवड्यात त्याने एक शो केला होता. त्यामध्ये त्याने कोकणी माणसांवर टीका केली होती. त्यांच्याविषयी अपशब्द वापरले. हे कोकणी लोक * बनवतात.) अशी अश्लील टीका त्याने केली होती. यानंतर वादाचे मोहळ उठले. अशा शब्दाचा वापर केल्याने कोकणी माणूस नाराज आणि संतप्त झाला. कोकणी माणसावर असं बोलण्याचा अधिकार मुनावरला कुणी दिला, असं म्हणत त्यानंतर वातावरण पेटलं होतं. एका शब्दामुळे मुनावरविरोधात वातावरण तयार झालं.
फटकवण्याचा दिला होता इशारा
हा वाद वाढल्यानंतर मराठी नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते, आमदार आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा समाधान सरवणकर यांचा मुलाने मुनव्वरला मारहाण करणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर केलं. पाकिस्तानप्रेमी मुनव्वरने कोकणी लोकांची माफी मागितली नाही, तर जिथे दिसेल तिथे त्याला बदडणाऱ्यांना एक लाख रुपये देण्यात येतील, असे सरवणकर यांनी जाहीर केले. मनसेने मुनावर जिथे दिसेल, तिथे फटकवण्याचे जाहीर केले.
माफी न मागितल्यास....
या प्रकरणात भाजपनेही उडी घेतली. भाजप नेते नितीश राणे यांनी मुनावरची चांगलीच कान उघडणी केली. तुझ्यासारखे हिरवे साप पाकिस्तानात पाठवायला जास्त वेळ लागणार नाही. तू कोकणातील जनतेला शिव्या दिल्या आहेस. माफी न मागितल्यास तुला पाकिस्तानला पाठवण्यास आम्हाला वेळ लागणार नाही, अशी धमकीच त्यांनी दिली.
मुनव्वर फारुकी याने मागितली माफी
सगळीकडून हल्लाबोल सुरू झाल्याने मुनव्वर फारुकी याने त्याने वापरलेल्या अपशब्दाबाबत माफी मागितली. माझ्या बोलण्यातून गैरसमज झाला. कोकणी समुदायाबद्दल मी काहीतरी चुकीचे बोललो असे काहींना वाटते. त्यांची मी चेष्टा केली असा गैरसमज झाला. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. कोकणावर माझे खूप खूप प्रेम आहे आणि मी माफी मागतो, असे फारुकीने स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications