सैफवर हल्ला कसा झाला? पोलिसांनी आरोपी शहजादसोबत रिक्रिएट सीन पुन्हा तयार केला, असा घडला घटनाक्रम
Bollywood Actor Saif Ali Khan: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत एक नवीन अपडेट समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादसह सैफच्या घरी पोहोचले. सैफवर हल्ला झाला होता त्या दिवशी काय घडलं होतं, त्या घटनेचा रिक्रिएट सीन तिथे पुन्हा तयार करण्यात आला आहे. पोलिसांनी सुमारे एक तास रिक्रिएट सीन तयार केला आणि नंतर आरोपीसह सैफच्या घरातून निघून गेले.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याचा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादची चौकशी सुरू आहे. घटनेच्या दिवशी घडलेल्या घटनेचा सीन पुन्हा रिक्रिएट करण्यासाठी पोलिसांनी सैफच्या घरी भेट दिली. तासाभराच्या चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीला बाहेर काढलं.

16 जानेवारीच्या रात्री आरोपी शरीफुल सैफ-करीनाच्या घरात घुसला होता. त्यारात्री आरोपीने सैफवर चाकूने 6 वार केले. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या शरीफुलने अभिनेत्यावर हल्ला केला. जखमी सैफ अजूनही रुग्णालयात दाखल आहे, परंतु डॉक्टरांचे म्हणण्यानुसार सैफच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. त्याला बेड रेस्टचा सल्ला देण्यात आला आहे. सैफवरील या हल्ल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे . बॉलिवूडकरांनी सैफ-करीनाच्या कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. मुंबई पोलिसांनी ठाण्यातून हल्लेखोराला अटक केली.
शरीफुल सैफच्या घरात कसा घुसला?
16 जानेवारी रोजी घटनेच्या दिवशी आरोपी शरीफुल सैफ हा पायऱ्यांवरून इमारतीच्या सातव्या मजल्यावर पोहोचला. सैफ त्याच्या कुटुंबासह या मजल्यावर राहतो. आरोपीने डक्ट क्षेत्रात प्रवेश केला आणि पाईपच्या मदतीने 12 व्या मजल्यावर प्रवेश केला. त्यानंतर तो सैफ आणि करीनाचा धाकटा मुलगा जहांगीरच्या खोलीतील बाथरूममध्ये शिरला. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याला सैफच्या घरातील कर्मचारी महिलेने पकडले तेव्हा दोघांमध्ये झटपट झाली. त्यावेळी या गोंधळाचा आवाज सैफच्या कानावर पडला. त्यावेळी त्याच्या खोलीच्या बाहेर आला त्यावेळी सैफ आणि आरोपीमध्ये झटपट झाली. आरोपींने सैफवर चाकूने सपासपा 6 वार करुन त्याला गंभीर जखमी केलं.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Police along with Mohammad Shariful Islam Shehzad, the accused in the Saif Ali Khan attack case, leave from Saif Ali Khan's residence after recreating the crime scene. pic.twitter.com/txkYhOFsLM
— ANI (@ANI) January 21, 2025
बांगलादेशला परतायचे होते, म्हणून मी चोरी केली
मुंबई पोलिसांच्या माहीतीनुसार शरीफुलला भारतीय ओळखपत्र बनवायचे होते. या कारणास्तव त्याने चोरी करून पैसे कमविण्याची योजना आखली. पण नंतर त्याचा प्लॅन बदलला. जेव्हा तो एका डान्स बारमध्ये काम करत होता आणि तिथे पैसे येत असल्याचे पाहत होता. तेव्हा त्याला वाटले की, तो शक्य तितके पैसे कमवेल आणि नंतर बांगलादेशला परत येईल. त्याने वांद्रे परिसराला लक्ष्य केले आणि चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरी गेला. त्याला माहित होते की तो एका सेलिब्रिटीच्या घरात शिरला आहे.












Click it and Unblock the Notifications