Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आता मोहिनी डे हिनेही दिला संगीतकार मार्क हार्टसला घटस्फोट! तिचे एआर रहेमानशी काय आहे कनेक्शन वाचा

Mohini Dey Divorce : प्रसिद्ध संगितकार एआर रहेमान याला त्याची पत्नी सायरा बानो हिने घटस्फोट देण्याची घोषणा केल्यानंतर आता दिग्गज संगीतकार मार्क हार्टसला तिची पत्नी मोहीनी डे हिनेही घटस्फोट दिला आहे. मोहीनीचे एआर रहेमानशी एक खास कनेक्शन आहे आणि हे कनेक्शन चर्चेत आहे.

प्रसिद्ध गायक एआर रहमानने त्याची पत्नी सायराला घटस्फोट दिला. घटस्फोटाची घोषणा करून चाहत्यांना तिने आश्चर्यचकित केले. मोहिनी डे हिने तिचा पती, संगीतकार मार्क हार्टसचपासून वेगळे होण्याची घोषणा केली अशा बातम्या येत आहेत. या जोडप्याने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे एकत्रित बातमी शेअर केली आहे.

Mohini Dey Divorce


काय आहे मोहिनी आणि तिच्या पतीची पोस्ट?

पोस्टमध्ये या जोडगोळीने सांगितले की, त्यांनी घटस्फोटाचा निर्णय परस्पर संमतीने घेतला आहे. ही घोषणा ए.आर. रेहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो विभक्त झाल्यानंतर काही तासांतच समोर आली आहे. मोहिनीने तिच्या इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये मोहीनीने लिहिले, "जड अंतःकरणाने, मार्क आणि मी जाहीर करतो की आम्ही वेगळे झालो आहोत. सर्वप्रथम, आम्ही आमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना हे स्पष्ट करू इच्छितो की हा परस्परांचा निर्णय आहे. आम्ही दोघेही चांगले मित्र राहू, पण आम्हा दोघांनाही समजले की आम्हाला जीवनात वेगवेगळ्या गोष्टींची गरज आहे आणि परस्पर संमतीने वेगळे होणे हे सर्वोत्तम पाऊल होते.

मोहिनीचे ए. आर. रहेमानसोबत खास नाते..

मोहिनीने तिच्या समर्थकांना तिच्या पर्सनल गोष्टींचा आदर करण्याची आणि कोणत्याही प्रकारची कमेंट करु नका अशी विनंती केली आहे. मोहिनी ही बास प्लेअर आहे, जी कोलकाताची आहे. त्यांनी ए.आर. रहमानसोबत 40 हून अधिक शो केले आहेत आणि ऑगस्ट 2023 मध्ये त्याचा पहिला अल्बम देखील रिलीज केला आहे.

कालच 19 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो यांनी 29 वर्षांच्या लग्नानंतर वेगळे होण्याची घोषणा केली. सिंगरच्या पत्नीने घटस्फोटाची घोषणा केली होती. या जोडप्याने 1995 मध्ये लग्न केले आणि त्यांना तीन मुले आहेत. सायराने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत म्हटले की, त्यांच्या नात्यात अनेक समस्या होत्या ज्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+