Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाकिस्तानी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही,'लिजेंड ऑफ मौला जाट'वरुन राज ठाकरेंचा इशारा

The Legend of Maula Jatt : पाकिस्तानी चित्रपटावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. 'लिजेंड ऑफ मौला जाट' हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे पण हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. ठाकरे यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट करत हा इशारा दिला आहे.

राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये काय म्हटले आहे?

फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, 'लिजेंड ऑफ मौला जट' नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात?

आणि कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरु आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे.

Raj on Legend of Maula Jat

अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की.

या आधी असे प्रसंग जेंव्हा आले होते तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा प्रदर्शित करण्याच्या भानगडीत पडू नका.

हा सिनेमा जेंव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही. आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार. आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे.

त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं. मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये.

राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे.

फवाद खान आणि माहिरा खान स्टारर चित्रपट

'द लीजेंड ऑफ मौला जट' हा फवाद खान आणि माहिरा खान स्टारर चित्रपट आहे. हा चित्रपट 13 ऑक्टोबर 2022 रोजी पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट त्यावेळी ब्लॉकबस्टर ठरला आणि बंपर कमाईही झाली. आता हा पाकिस्तानी चित्रपट भारतात 2 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे, परंतु त्यापूर्वीच त्याबद्दल भारतात राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. तर मनसेने फवाद खानच्या चाहत्यांना देशद्रोही म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+