Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Miss World Grand Finale मिस वर्ल्ड ग्रँड फिनाने आज! एका क्लिवकर जाणून घ्या वेळ, कुठे कधी पाहाल LIVE

Miss World Grand Finale 2025 :72 व्या मिस वर्ल्ड फेस्टिव्हल 2025 चा ग्रँट फिनाले आज म्हणजेच 31 मे रोजी तेलंगणातील हैदराबाद येथे होत आहे. जगभरातील सुंदरी आज अंतीम फेरीत आपल्या सौंदर्याची जादू दाखवणार आहे. यातून एक जगतसुंदरी निवडली जाणार आहे, तीच ठरणार मिस वर्ल्ड 2025...

हैदराबादेत मिस वर्ल्ड 2025 ची अनेक दिवसांपासून रंगत सुरु आहे. अत्यंत विलोभनीय आणि हायटेक कार्यक्रमाचे प्रदर्शन येथे सुरु आहे. आज या स्पर्धेची अंतीम फेरी रंगणार असून या सोहळ्यात भारतातर्फे कोण सहभागी आहे, ही स्पर्धा लाईव्ह कुठे कधी बघू शकतो तसेच या सोहळ्याची वेळही जाणून घेऊया.

Miss World Grand Finale 2025

नंदीनी गुप्तावर सर्वांच्या नजरा

भारताकडून नंदिनी गुप्ता या स्पर्धेत आपले कसब दाखवत आहे. सांगायचे झाल्यास नंदिनी गुप्ता ही एप्रिल 2023 मध्ये रंगलेल्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत मिस वर्ल्ड इंडिया 2023 ची विजेती आहे. तिने राजस्थानकडून देशांतर्गत झालेल्या या स्पर्धेत नैतृत्व केले होते. या स्पर्धेत भारतातील 29 राज्यातील 30 स्पर्धक तरुणी सहभागी झालेल्या आहेत.

कधी आणि कुठे बघाल मिस वर्ल्ड ग्रँड फिनाले?

  • मिस वर्ल्ड ग्रँड फिनाले 2025 च्या आयोजकांच्या माहितीनुसार, ही स्पर्धा पहिल्यांदाच जगातील सर्व दर्शक लाईव्ह पाहू शकणार आहेत.
  • काही निवडक देशांच्या राष्ट्रीय वाहिन्यांद्वारे किंवा www.watchmissworld.com या वेबसाईटवरही तुम्ही ही स्पर्धा पे-पर व्ह्युव्हसह लाईव्ह पाहू शकता.
  • भारतात SONY LIVE APP वर आज ही स्पर्धा भारतीय प्रमाणवेळेनुसार, तुम्हाला सायंकाळी साडेसहा वाजता पाहता येणार आहे.

कोण आहे नंदिनी गुप्ता जाणून घ्या?

  • नंदिनी गुप्ता हिचा 2004 मध्ये राजस्थानच्या कोटा शहरात जन्म झाला.
  • नंदिनी गुप्ता सध्या मुंबईतील लाला लाजपत राय कॉलेजमधून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे.
  • दहा वर्षांची ती होती तेव्हा मिस इंडिया बनण्याचे तिचे स्वप्न होते.
  • फेमिना मिस इंडिया 2023 दरम्यान, नंदिनीने तिच्या उत्तरांनी सर्वांचे मन जिंकले होते.

जग बदलायचे की स्वःतला? काय म्हणाली नंदिनी..

नंदिनी गुप्ता हिला मिस इंडिया 2023 या स्पर्धेत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानुसार जेव्हा तिला विचारण्यात आले की तिला जग बदलायचे आहे की स्वतःला, तेव्हा ती म्हणाली, "मी स्वतःला बदलेन कारण बदल नेहमीच आतून सुरू होतो. ज्याप्रमाणे कौतुक आणि दानधर्म घरापासून सुरू होतात, त्याचप्रमाणे बदल देखील आतून येतो." ती पुढे म्हणाली, "जर तुम्ही स्वतःला बदलू शकता, तर तुम्ही जगालाही चांगले बनवू शकता."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+