2026मध्ये येणार मिर्झापूर चित्रपट, दीड मिनिटांचा टीझर लाँच; जबदस्त अॅक्शन अन् मुन्ना भैय्याचे कमबॅक
Mirzapur film : एक्सेल मूव्ही प्रॉडक्शन हाऊसने नुकतीच मिर्झापूर या चित्रपटाची घोषणा केली आहे. इंस्टा अकाऊंटवर यांसंदर्भात टीझर रिलीज केला. त्यात त्यांनी लिहिले की, आता कालावधी मोठा असेल अन् पडदाही मोठा असणार. त्यामुळे मिर्झापूर चित्रपट 2026 मध्ये चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय मालिका मिर्झापूरचे 3 यशस्वी सीझन झाले आहेत. आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी निर्मात्यांनी एक मोठी भेट आणली आहे. एक्सेल मूव्हीजने मिर्झापूरची अधिकृत घोषणा करणारा एक घोषणा टीझर रिलीज केला आहे. आगामी चित्रपटात मुन्ना भैय्या ऊर्फ दिव्येंदू शर्माचे पुनरागमन देखील निश्चित झालेले आहे. ज्याचे पात्र मालिकेतून काढून टाकण्यात आले होते.

पंकज त्रिपाठींचे जबरदस्त संवाद
एक्सेल मूव्ही प्रॉडक्शनच्या वतीने निर्मात्यांनी 1 मिनिट 30 सेकंदांचा एक टीझरदेखील जारी केला आहे, ज्यामध्ये कालिन भैया उर्फ पंकज त्रिपाठी म्हणत आहेत, 'तुम्हाला गद्दी, आदर, शक्ती, नियंत्रणाचे महत्त्व माहिती आहे. तुम्हीही मिर्झापूरला तुमच्या गादीवर बसलेले पाहिलं असेल, पण यावेळी तुम्ही गादीवरून उठला नाही तर धोका असेल.
यावर गुड्डू भैया उर्फ अली फजल म्हणतो, 'तुझं म्हणणं बरोबर आहे कालीन भैया, रिस्क घेणं हा आमचा यूएसपी आहे, आता काहीही झालं तरी सारा खेळ बदलला आहे. आता काय, आता मिर्झापूर तुझ्याकडे येणार नाही, तुला मिर्झापूरला यावं लागेल.
मुन्ना भैय्या जबदस्त कमबॅक करणार
रिलीज झालेल्या टीझरनुसार, मिर्झापूर चित्रपटात मालिकेतील महत्त्वाचे पात्र मुन्ना भैय्याचे पुनरागमन असणार आहे. ज्याची भूमिका दिव्येंदूने साकारली होती. मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये त्याची व्यक्तिरेखा मारली गेली होती. अभिषेक बॅनर्जी, कंपाउंडरची भूमिका साकारत आहे, ज्याचे पात्र पहिल्या सीझनमध्ये मारले गेले होते, तो देखील चित्रपटात पुनरागमन असणार आहे.
मिर्झापूर 2026 मध्ये मोठ्या पडद्यावर येणार
घोषणेनुसार मिर्झापूर हा चित्रपट 2026 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. एक्सेल मूव्हीच्या बॅनरखाली रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी याची निर्मिती केली आहे. गुरमीत सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.












Click it and Unblock the Notifications