उदय सामंत यांची छावा चित्रपटातील डान्स सीन, दृष्यांवर आक्षेप; मुव्ही प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा!
Minister Uday Samant objects to dance scene in Chhawa : महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि महायुती सरकारमधील मंत्री उदय सामंत यानी आगामी छावा चित्रपटातील काही गोष्टींबद्दल तीव्र आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृष्ये आहेत ती काढून टाकावी आणि दिग्दर्शकाने ऐतिहासिक गोष्टी अचूक मांडाव्या असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
काय म्हणाले उदय सामंत
उदय सामंत यांनी आगामी ऐतिहासिक चित्रपट 'छावा' बद्दल बोलताना म्हटले की, हा चित्रपट "इतिहासकार आणि अभ्यासक" यांना दाखवावा आणि त्यांनी काही आक्षेप घेतल्यास "आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करु देणार नाही". मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरने 'छावा' हा ऐतिहासिक चित्रपट बनवला आहे, ज्यात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ऐतिहासिक संदर्भ आहेत आणि त्यांची भुमिका विकी कौशल या अभिनेत्याने केली आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे, ज्यात शूर मराठा शासकाच्या गौरवशाली कारकिर्दीचे चित्रण करण्यात आले आहे.

दिग्दर्शकाने जर यात काही आक्षेपार्ह भाग असेल तर तो कापावा. हा चित्रपट इतिहास अभ्यासकांना दाखवावा. जर त्यांनी आक्षेप घेतला तर आम्ही ते प्रदर्शित होऊ देणार नाही." हे त्यांनी स्पष्ट केले. विशेष बाब म्हणजे याआधी सामंत यांनी संभाजी महाराजांची कथा मोठ्या पडद्यावर आणण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले, परंतु ऐतिहासिक अचूकतेवर भर दिला आणि सामंत यांनी 'छावा'चे निर्माते आणि दिग्दर्शकांना विचारले.
नेमके काय आहे मंत्री उदय सामंत यांचे ट्वीट
"धर्मरक्षक,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे, छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहे. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे. महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने या बाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही!"
धर्मरक्षक,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे, छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहे. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि…
— Uday Samant (@samant_uday) January 25, 2025
मराठा राजाचा आदर राखण्यासाठी जबाबदारीने वागावे
धर्माचे रक्षक आणि स्वातंत्र्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर हिंदी चित्रपट बनत आहे ही आनंदाची बाब आहे. छत्रपतींचा इतिहास जगाला समजावून सांगण्यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत. मात्र, या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये, अशी आमची भूमिका आहे अस सामंत यांचे म्हणणे आहे.
'छावा'चा ट्रेलर रिलीज
काही दिवसांपूर्वीच 'छावा'चा ट्रेलर रिलीज झाल्याची घोषणा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केली होती. अशा परिस्थितीत ठरल्यानुसार 22 जानेवारीला चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मॅडॉक फिल्म्सने ते आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर तो लॉन्च केले आहे.
रश्मिकाच्या लुक्सची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की विकी कौशल शूर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत खूपच डॅशिंग दिसत आहे. तर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री रश्मिका मंदान्ना दिसते. याशिवाय दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या या सिनेमात, मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना याने साकारली आहे आणि अक्षय हा खलनायकाच्या भूमिकेत आहे.... त्याचा लुकच्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरु आहे....
छावामधील रश्मिका मंदानाचा नववारी साडीतला मराठमोळा लूकमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय झालाय... आता त्यांचा दमदार अभिनयाची झलक हि छावाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. एकूणच, हा 3 मिनिट 8 सेकंदाचा ट्रेलर तुम्हाला खिळवून ठेवतो... आणि संभाजी महाराजांचे पात्रांने म्हणजेच विकी कौशलने साकारलेली भुमिका तुम्हाला तुमचे डोळे हटवू देणार नाही असं दिसतं.. छावाचे निर्माते दिनेश विजन आणि अमर कौशिक आहेत, ज्यांनी यापूर्वी गेल्या वर्षी स्त्री 2 सारखे मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट दिले होते...
छावा कधी प्रदर्शित होणार?
विकी कौशलचा छावा हा चित्रपट गेल्या वर्षी सहा डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. पण साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 सोबत बॉक्स ऑफिसची कमाई पाहता छावाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट पुढील महिन्यात व्हॅलेंटाईन डेला म्हणजेच 14 फेब्रुवारीला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर सर्वजण या सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications