Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Metro Viral Video :'आज की रात' वर मेट्रोमध्ये तरुणीची 'ती' रिल्स व्हायरल! बापरे अशा कमेंट!

Metro Viral Video : सार्वजनिक वाहतुकीचे ठिकाण असलेल्या मेट्रोत चक्क एका तरुणीने असे काही काम केले की, तुम्ही पाहून थक्क व्हाल.. जर ती कृती तुम्हाला आवडली नाही तर तुम्हीही म्हणाल की अरे हे काय...असो घडलेल्या घटनेबद्दल आपण जाणून घेऊया की, तरुणीने मेट्रोमध्ये काय केलं ते...

मेट्रो ट्रेन हे वाहतुकीचे सर्वात सोयीचे साधन मानले जाते. महानगरात तर ही सेवा खूपच महत्वाची मानली जाते. पण मेट्रो हल्ली विचित्र कारणांमुळे चर्चेत आहेत ते नियंत्रण नसलेल्या काही प्रवाशांमुळे. कुणीही या अन् काहीही वर्तन करा अशीच स्थिती येथे आहे. हाणामाऱ्या असो की, भांडण कि रिल्स या सर्व गोष्टींमुळे मेट्रो हल्ली फार चर्चेत राहते.

Metro Viral Video

डान्स कधी आणि कुठे ...

डान्स म्हटलं की, सर्वांना आवडणारी गोष्ट जीवनात कधी ना कधी डान्स केलाच असेल पण तुम्ही डान्स कुठे करता आणि काय परिस्थिती आहे निमित्त काय आहे हे महत्वाचं असतं. हे आपण पुर्वापार पाळतही येतो. काही खास कारण असेल तर नृत्य करणाऱ्याला उलट प्रोत्साहन दिलं जातं पण कधी कधी तुम्ही कुठे नृत्य करता याला खूप महत्व आहे. जर तुम्ही अशा ठिकाणी आणि वेळी नृत्य करता जेव्हा ती योग्य वेळ काळ नसतो तेव्हा लोक ट्रोलही करु शकतात.

त्या तरुणीची अशी रिल्स...

रील आणि विचित्र ड्रेसिंगचे अनेक व्हिडिओ ऑनलाइन समोर आले आहेत, ज्यामुळे लोक अवाक् झाले आहेत. आता, स्त्री 2 चित्रपटातील तमन्ना भाटियाच्या 'आज की रात' या लोकप्रिय गाण्यावर नाचत असलेल्या एका महिलेचा व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे आणि सोशल मीडिया युजर्समध्ये नाराजी पसरली आहे. सहेली नामक एका युजरने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती बॉलीवूडच्या गाण्याच्या तालावर मेट्रो कोचच्या मध्यभागी नाचताना दिसतेय. हा व्हिडिओ आता खुपच चर्चेत आला असून यावर अनेक प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत.

सहेलीने चक्क मेट्रोमध्ये रिल्स केली एवढचं नाही तर तिनं या मेट्रोमध्ये डान्स केला आणि तो डान्स काही लोकांना रुचला पण काहींना मात्र तो रुचला नाही त्यावर समिश्र प्रतिक्रीया आल्या.

निगेटीव्ह कमेंट

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधले गेले आणि प्रतिक्रियाही आल्या आहेत. बेटी बचाओ मेट्रो मे नचाओ अशी टीका एका युजर्सने केली आहे. "लोक त्यांचे स्थान गमावत आहेत; नृत्य प्रदर्शनासाठी हे योग्य ठिकाण नाही," असं एका युजर्सने म्हटलं आहे "ही सार्वजनिक जागा आहे आणि डान्सची सार्वजनिक मागणीही नाही असे एकाने म्हटले

तरुणीच्या बाजूने कमेंट

एका युजर्सने सपोर्ट केला, तो म्हणतो की, "ती तिचं उत्तम आयुष्य जगत आहे! आनंद मिळत असेल तर नाचत का नाही?" वापरकर्त्याने लिहिले. "आत्मविश्वास आणि महत्त्वाच्या अशक्य गोष्टींमुळे शक्य होणाऱ्या गोष्टी मिळतील ज्याला टॅलेंट लाइफ म्हणतात सुपर अप्रतिम आश्चर्यकारक तेजस्वी रील्स क्लासिकल मॅडम जी सार्वजनिक ठिकाणी रील छान बनवतात," दुसऱ्याने टिप्पणी केली.

एवढ्या आल्या व्ह्युज

एकाने हा डान्स तर तु्म्ही घरी करु शकला असता असं म्हटलं तर दुसऱ्यांने लोकांची मागणी असेल तर तुम्ही काहीही कराल का असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. काही दिवसांपूर्वीच हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून, याने जवळपास नऊ लाख व्ह्युज आणि 24 हजारांवर लाईक्स आले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+