'सजना'चा ट्रेलर प्रदर्शित, प्रेम अन् क्षणात विश्वासघाताची ठिणगी सुडाची आग! काय आहे सिनेमात खास? वाचा
Marathi movie 'Sajana' trailer out : मराठी रसिकांसाठी चित्रपट 'सजना' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरचे थेट प्रक्षेपण मराठीतील मनोरंजनाशी संबंधित विविध चॅनेलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर करण्यात आले.
या ट्रेलरच्या माध्यमातून सजना चित्रपटाची एक खास झलक समोर येते. सुंदर प्रेमाची सुरुवात, विचारसरणीतील अंतर, भावनिक संघर्ष, सुडाची भावना आणि प्रत्येक वळणावर धक्कादायक ट्विस्ट यात पाहायला मिळणार आहे.

या कथेचा अनपेक्षित शेवट
नायक आणि नायिकेच्या आयुष्यात येणारे संघर्ष, मैत्रीचं प्रेमात रूपांतर, प्रेमाचं तुटणं आणि त्यातून उगम पावणारा सूड हे सगळं अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. प्रत्येक वळणावर गोष्ट बदलते, पात्रांचे रंग बदलतात आणि कथा एका अनपेक्षित शेवटाकडे प्रवास करते. शेवट अकल्पनीय आहे.
जेव्हा प्रेक्षकांना वाटतं की सारं काही संपलं आहे, तेव्हाच ही कथा एक अनपेक्षित वळण घेते जी प्रेक्षकांचे मन सुन्न केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एक विलक्षण सिनेमॅटिक अनुभव सिनेप्रेमींना या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे.
शशिकांत धोत्रे यांची कथा, पटकथा अन् संवाद
'सजना' या चित्रपटाची निर्मिती शशिकांत धोत्रे यांनी केली असून कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनही धोत्रे यांचेच आहे. छायाचित्रण रणजित माने यांनी केलं आहे. संगीत ओंकारस्वरूप यांचं असून सिनेमातील रोमान्टिक गाणी भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली बनली आहेत.
कधी होणार सजना रिलिज
'सजना' हा एक खास आगळावेगळा मराठी चित्रपट 27 जून 2025 रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने मराठी चित्रपटाची या सिनेमाच्या निमित्ताने रसिकांना मेजवानी मिळणार आहे.












Click it and Unblock the Notifications