Tushar Ghadigaonkar suicide : धक्कादायक! मराठी कलाकार तुषार घाडीगांवकरची आत्महत्या, हे आलं कारण समोर
Marathi actor Tushar Ghadigaonkar commits suicide : लागीर झालं जी फेम अभिनेता तुषार घाडीगांवकर याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज 21 जून रोजी उघडकीस आली. शुक्रवारी 20 जून 2025 रोजी त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर मराठी रंगभुमी आणि चित्रपट क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अभिनेता तुषार घाडीगावकरच्या आत्महत्येचे कारण काय आणि अजून कारकिर्दीला बहर येण्यापुर्वीच त्याने जगाचा निरोप का घेतला याबद्दल मराठी चित्रपटसृष्टीत चर्चा होत आहे.

काय आहे तुषार घाडीगांवकरच्या आत्महत्येचे कारण?
मीडिया रिपोर्टनुसार, तुषार घाडीगांवकर नैराश्याने ग्रस्त होता. तो बऱ्याच काळापासून कामाच्या शोधात होता. काम न मिळाल्याने तो नैराश्यात होता, असे बोलले जात आहे. त्यातूनच त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
तुषारचे कुटुंब, चाहते अन् मित्रही हैराण..
तुषार घाडीगांवकरच्या अचानक एक्झिटने त्याचे कुटुंब हादरुन गेले असून मित्र आणि चाहतेही हैराण झाले आहेत. मराठी चित्रपट उद्योगातही त्याच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. कारण आत्महत्येचे कारण भीषण आहे, चित्रपटसृष्टीत काम मिळत नसल्याने आत्महत्या करणे म्हणजे खूप भयावह गोष्ट आहे अशा प्रतिक्रीया आता इंडस्ट्रीतून येत आहेत.
लागीर झालं जी ते उनाडमध्ये साकारली भुमिका
तुषार घाडीगांवकरने अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लागीरं झालं जी' मधील भूमिकेसाठी त्याला खूप ओळख मिळाली. याशिवाय, 'लवंगी मिर्ची', 'मन रे' आणि 'सुखच्या बावरे' सारख्या टीव्ही शोमध्ये त्याने आपल्या अभिनयाने आपले कौशल्य सिद्ध केले होत. तुषार 'भाऊबली', 'उनाड' आणि 'झोंबिवली' सारख्या चित्रपटांमध्येही दिसला. त्याने 'संगीत आख्यान' आणि 'सखा पांडुरंग' सारख्या कार्यक्रमांमध्येही काम केले.
उमदा कलाकार तुषार घाडीगावकर सिंधूदुर्गचा मुळ रहिवासी
तुषार घाडीगांवकर हा उमदा आणि मेहनती कलाकार होता, मराठी इंडस्ट्रीमध्ये पाय रोवत असतानाच त्याला आत्महत्येसारखी वाट पत्करावी लागली. तुषार मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील रहिवासी होता. तुषार रूपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात सक्रिय होता. कॉलेजनंतर त्याने थिएटर, टीव्ही शो आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. पण त्यांच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
मराठी कलाका
'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता अंकुर वाधे यांनी फेसबुकवर श्रद्धांजली वाहिली. आणि तुषारला संबोधून लिहिले की, "का मित्रा? कशासाठी? काम येत राहते! आपल्याला मार्ग शोधावा लागतो, पण आत्महत्या हा मार्ग नाही! तुषार, जर तू हरलास तर आपण सर्वजण हरलो...". मुग्धा गोडबोले, समीर पाटील आणि अभिषेक देशमुख सारख्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर तुषारच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तुषार घाडीगांवकरच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.












Click it and Unblock the Notifications