Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महामंडलेश्वर होण्यासाठी १० कोटी दिले..? ममता कुलकर्णी म्हणते उधार घेऊन मी...

किन्नर आखाड्याने अलीकडेच काही कारणांमुळे ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना महामंडलेश्वर पदावरून हटवले. अनेक संत-महंतांनी ममता कुलकर्णीच्या महामंडलेश्वर पदावर नाराजी व्यक्त केली होती. अखेर आखाड्याने ममताला या पदावरुन दूर सारले. या पदासाठी ममता कुलकर्णीने १० कोटी दिल्याच्या चर्चा, सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. एका मुलाखतीत ममता कुलकर्णीने या सगळ्या अफवा असल्याचे सांगितले.

Mamta Kulkarni

रामदेव बाबा-धीरेंद्र शास्त्रींना उत्तर

ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनविण्यात आल्यानंतर स्वामी रामदेव बाबा आणि धीरेंद्र शास्त्री यांनी नाराजी व्यक्त केली होती. रामदेव बाबांनी तर पैसे देऊन कुणीही कोणतेही पद घेऊ शकतो, असे म्हटले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ममता कुलकर्णीने या दोघांनीही उत्तर दिले. रामदेव बाबांच्या प्रश्नावर ती म्हणाली की, मी याचे उत्तर रामदेव बाबांवर सोडते. मी त्यांच्या विधानावर जास्त बोलू इच्छित नाही. दुसरीकडे ममताने धीरेंद्र शास्त्री यांना मात्र परखड उत्तर दिले. ती म्हणाली, ते लंगोट घातलेले धीरेंद्र शास्त्री आहेत. त्यांचे जेवढे वय आहे तेवढी तपश्चर्या मी केली आहे. मी २३ वर्षे तपश्चर्या केली, असंही ममताने त्या मुलाखतीत सांगितलं.

माझ्याकडे एक कोटीही नाहीत

महामंडलेश्वर होण्यासाठी किन्नर आखाड्याला १० कोटी दिल्याचा आरोप, ममता कुलकर्णींनी फेटाळून लावला. ती म्हणाली, १० कोटी सोडी, माझ्याकडे एक कोटी रुपयेही नाहीत. माझी बँक खाती गोठविण्यात आली आहेत. जेव्हा मला महामंडलेश्वर बनविण्यात आले तेव्हा गुरुला दोन लाख रुपये गुरुदक्षिणा द्यायची होती. ते दोन लाख मी दुसऱ्याकडून उधार घेतलेत. माझ्या तीन घरांची डागडूजी करायची आहे. मी २३ वर्षांपासून तेथे गेलेली नसल्याने त्यांची दुसस्ती करावी लागणार आहे, मात्र त्यासाठीही माझ्याकडे पैसे नाहीत, असंही ममता कुलकर्णीने सांगितलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+