'मी म्हातारी नाही, माझ्यापेक्षा वयाने लहान मुलासोबत आहे...', मलायका अरोराने केला धक्कादायक खुलासा
Malaika Arora: बॉलिवूडची डान्सिंग क्वीन आणि अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोराच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली होती. खरं तर घटस्फोटानंतर मलायका तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतंय.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचे नाते
सध्या मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, दोघांनीही यावर भाष्य केलेले नाही. या सगळ्यात मलायकाचे एक वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मलायकाने तिच्या लव्ह लाईफवर अशी कमेंट केली आहे
मलायका अरोरा हिने तिच्या 'मूव्हिंग इन विथ मलायका' या शोमध्ये स्टँड अप कॉमेडी करताना असे वक्तव्य केले होते, जे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. मलायकाने फक्त तिच्या लव्ह लाईफवर कमेंट केली होती. याशिवाय अर्जुनसोबतच्या नात्याची खिल्ली उडवणाऱ्या लोकांना मलायकाने सडेतोड उत्तर दिले आहे.
'मी एका लहान मुलाला डेट करत आहे'
मलायका अरोराने तिचे वय आणि तिच्यापेक्षा लहान मुलाला डेट करण्याबाबत केलेल्या विधानाने सर्वांनाच धक्का बसला आहे. मलायकाने या शोमध्ये म्हटले आहे- मी म्हातारी नाही, मी माझ्यापेक्षा लहान मुलाला डेट करत आहे. माझ्यात खूप हिंमत आहे. मी कोणाचेही आयुष्य उध्वस्त करत नाही.
'मी त्याला रस्त्यावरून पकडून आणले नाही'
मलायका अरोरा पुढे म्हणाली- असे नाही की तो शाळेत जायचा आणि त्याला अभ्यासात रस नव्हता. मी त्याला सर्व काही सोडून माझ्यासोबत येण्यास सांगितले नाही. म्हणजे प्रत्येक वेळी डेट करताना तो त्याचा वर्ग चुकवतो असे नाही. ज्या रस्त्यावर तो पोकेमॉन पकडत होता तिथून मी त्याला पकडले नाही. तो मोठा झालेला मुलगा आहे. मलायकाच्या आयुष्यात आता कोणत्या नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली की ती अर्जूनबद्दलच बोलत आहे. हे आता चाहत्यांना लवकरचं कळेलं.












Click it and Unblock the Notifications