अर्जूनशी ब्रेकअपनंतर मलाईकाने केला 'तो' व्हिडिओ शेअर! स्पष्ट बोलली, म्हणाली त्रासदायक लोकांपासून...
malaika arora share video on instagram : तब्बल पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मलाईका अरोरा आणि अर्जून कपूरमध्ये ब्रेकअप झाला. गेली काही महिने हे दोघेही एकमेकांपासून लांब राहिले मात्र हे ब्रेकअपचे प्रकरण दोघांनीही कधीच उघड केले नाही.
गेल्या काही दिवासांत मात्र ब्रेकअपच्या चर्चांना या दोघांनीही अनौपचारिकपणे होकार दिलाय. त्यात मलाईकाने सोशल मीडियावर सुरु असलेल्या 'नो नोव्हेंबर' या ट्रेंडमध्येही ही गोष्ट पुन्हा एकदा उकरुन काढली. आता तिने हे अर्जूनला म्हटलंय की अजून कुणाला, पण लोक तिच्या या पोस्टचा संबंध थेट अर्जूनशीच जोडू पाहताहेत.

काय आहे 'नो नोव्हेंबर' ट्रेंड
सध्या सोशल मीडियावर नो नोव्हेंबर हा नवीनच ट्रेंड सुरु झालाय. आपल्याला या महिन्यात कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, त्यावर काहीजण पोस्ट करत आहेत. त्यालाच नो नोव्हेंबर ट्रेंड असं नाव दिलंय. आता याच नो नोव्हेंबर ट्रेंडमध्ये मलाईकानेही भाग घेतला. तशीही ती सोशल मीडियावर प्रचंड अँक्टीव्ह असते. तिने सोशल मीडियावर आयुष्यात त्रासदायक ठरणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करून सगळ्या गोष्टी हाताळता येण्यासाठी एका तज्ज्ञ व्यक्तीची मदत घेत आहे, अशा आशयाची पोस्ट केली.
मलाईकाचं 'नो नोव्हेंबर' काय
तिने 'नो नोव्हेंबर' मध्ये नऊ गोष्टी सोडणार असल्याचेची सांगितले. नो अल्कोहोल, आठ तास झोप, एक तज्ज्ञ व्यक्ती, दररोज व्यायाम, दररोज 10 हजार पावले, दररोज सकाळी 10 वाजेपर्यंत उपवास, प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळणे, रात्री 8 वाजल्यानंतर जेवायचे नाही या आठ गोष्टींबरोबर तिने त्रासदायक लोकांना आयुष्यातून काढून टाकणे हा नववा संकल्पही शेअर केला. विशेष म्हणजे अर्जून कपूरने त्यांच्या ब्रेकबद्दल उघडपणे वक्तव्य केल्यानंतर मलाईकाने ही पोस्ट शेअर केली.
तो मिस्ट्री मॅन कोण
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी 2018 मध्ये एकमेकांस डेट करण्यास सुरुवात केली होती. ते नेहमीच त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलत असत. एकमेकांबरोबरचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करीत असत. याआधी मलायका अरोराचे अरबाज खानबरोबर लग्न झाले होते. अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका काही महिन्यांपूर्वी परदेशात ट्रीपवर गेल्याचं दिसून आलं होतं. तिच्या सोबत एक मिस्ट्री मॅन देखील होता, हा मिस्ट्री मॅन कोण?असा प्रश्न चाहते विचारत होते. पण अद्याप तिनं यावर काही उत्तर दिलं नाहीये.












Click it and Unblock the Notifications