मलाईका पुन्हा पडली प्रेमात; काढलाय हा नवा टॅटू? या क्रिकेटपटूसोबत जोडले जातेय नावी? नेमकं प्रकरण काय
ग्लॅमरस अभिनेत्री मलाईका अरोरा ही तिच्या आगामी प्रोजेक्टपेक्षा तिच्या वैयक्तीक आयुष्याबाबतच जास्त चर्चेत राहते. अरबाज खानशी घेतलेला घटस्फोट, त्यानंतर अर्जून कपुरशी झालेला घटस्फोट अशा अनेक कारणांनी तिची कायम चर्चा होते. आता मलायकाची एका नव्या कारणासाठी चर्चा सुरु आहे. मलाईकाने आतापर्यंत अनेक टॅटू गोंदवले आहेत पण अलीकडेच तिने एक टॅटू काढला जो अचानक चर्चेत आलाय.

टॅटूची का होतेय चर्चा
आपल्या फिटनेस व सौदर्याने मलाईका कायम चर्चेत राहते. मात्र एका मुलाखतीत तिने तिच्या टॅटू प्रेमाविषयी स्पष्ट सांगितले. ती म्हणाली, मी फक्त मनोरंजनासाठी कधीही टॅटू काढत नाही. त्याच्याशी माझ्या भावना गुंतलेल्या असतात. हा खास टॅटू माझ्या २०२४ च्या आठवणी दाखवतो. सबर आणि शुक्र म्हणजेच संयम आणि कृतज्ञता हे दोन्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जेव्हा मी एक वर्षापूर्वी कोठे होते व आता कोठे आहे याचा विचार करते, तेव्हा हे दोन्ही शब्दच मला साथ देतात, असं मलाईका म्हणाली होती.
मलाईकाच्या टॅटूचे रहस्य
मलाईका जेव्हा जेव्हा नवी सुरुवात करते तेव्हा तेव्हा ती टॅटू गोंधते. आठ वर्षापूर्वी तिने टॅटू काढला होता. त्यावेळी तिचा अरबाज खानशी घटस्फोट झाला होता. या टॅटूमध्ये तिन उडणारे तीन पक्षी काढले होते. म्हणजेच आता ती आयुष्याची नवी सुरुवात करत आहे, हे तिने या टॅटूतून त्यावेळी दाखवून दिले होते.
वडिलांचे गेल्यावर्षी निधन
मलाईकासाठी २०२४ हे वर्ष खूप कठीण गेले. या वर्षी तिचे वडील अनिल मेहता हे जग सोडून गेले. दुसरीकडे तिचा अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपही झाला. वडिलांच्या निधनानंतर अर्जुन कपूर मलायकाच्या पाठीशी उभा राहिला. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर मलायका सध्या रेमो डिसूझासोबत एका रिअॅलिटी शोचे परीक्षण करताना दिसत आहे. मलायका तिच्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच तिला जज होणे खूप आवडते. ती शोमध्ये एक ग्लॅमर देखील जोडते. मलायकाने अनेक रिअॅलिटी शोज जज केले आहेत.
मलाईका पुन्हा पडली प्रेमात
मलाईकाचे नाव सध्या श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारासोबत जोडले जात आहे. त्यातच तिने हा नवीन टॅटूही काढला आहे. त्यामुळे ती नक्कीच त्याच्या प्रेमात पडली, असा अर्थ तिचे चाहते काढू लागले आहेत. कुमार संगकारासोबतच्या तिच्या नावाबद्दल तिला विचारले असता तिने सांगितले की, मी सध्या या गोष्टीकडे लक्ष देत नाही. मी फक्त संयम आणि कृतज्ञता यावर विश्वास ठेवते. मात्र तिच्या या नव्या टॅटूने ती नक्कीच पुन्हा प्रेमात पडलीय, असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.












Click it and Unblock the Notifications