Year Ender : 2024 मधील हे आहेत टॉप 5 सिनेमे, बॉलीवूडला मागे टाकत सुपरहिट राहिली ही साऊथची ही फिल्म
Year Ender 2024, Most Popular Indian Films : वर्ष 2024 ला निरोप देण्याची वेळ जवळ येत आहे. 2024 हे वर्ष अनेक बॉलीवूड आणि साऊथ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर गाजवले. अशा परिस्थितीत गुगल ते आयएमडीबीने 2024 च्या लोकप्रिय चित्रपटांची यादी जाहीर केली आहे.
शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान यांसारख्या बड्या स्टार्सचे चित्रपट 2024 साली प्रदर्शित झालेले नाहीत. असे असूनही 2024 हा काळ बॉलिवूडसाठी चांगला होता. तर साउथ सिनेमाने 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अशा परिस्थितीत चला तर जाणून घेऊया 2024 मधील टॉप चित्रपटांविषयी अन् त्याच्या कामगिरी विषयी.

IMDb सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट
स्त्री
2 बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाचेही खूप कौतुक झाले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शक अमर कौशिकच्या या चित्रपटाने २०२४ मध्ये लोकांचे खूप मनोरंजन केले. चित्रपटातील गाण्यांनीही लोकांच्या मनावर राज्य केले आहे.
महाराजा
दक्षिणेकडील चित्रपट 'महाराजा' ने IMDb सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट 2024 च्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटात विजय सेतुपती मुख्य कलाकाराच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठी कमाई केली आहे. सध्या हा चित्रपट चीनमध्ये धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितिलन समीनाथन यांनी केले आहे.
शैतान
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि आर माधवन यांचा थ्रिलर चित्रपट 'शैतान'ने लोकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटात आर माधवन नकारात्मक भूमिकेत दिसला होता, जो लोकांना खूप आवडला होता. लोकांनी चित्रपटाच्या कथेचे आणि आर माधवनच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे.
फायटर
बॉलीवूडचा देखणा अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणचा चित्रपट 'फाइटर' ने IMDb सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट 2024 च्या यादीत 5 व्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आहेत. या चित्रपटाची कथा लोकांना खूप आवडली आहे.
कल्कि 2898 एडी
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाने 2024 मध्ये खूप लोकप्रियता मिळवली आहे. या चित्रपटात बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चनही दिसले होते. या चित्रपटाने 2024 मध्ये मोठी कमाई केली असून सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन आहेत.












Click it and Unblock the Notifications