2024 च्या मोस्ट स्टायलिश लोकांच्या यादीत अनंत-राधिका जोडी टॉपवर, जाणून घ्या अन्य नावं
Most Stylish People 2024 : न्यूयॉर्क टाइम्सने नुकतीच 2024 मधील मोस्ट स्टायलिश लोकांची यादी प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे याच वर्षी लग्न झालेल्या राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचीही नावं या यादीत टॉपवर आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या या यादीत राधिका आणि अनंत यांची त्यांच्या उत्कृष्ट आणि मोहक शैलीसाठी प्रशंसा करण्यात आली आहे. या वर्षी त्यांचे लग्न आणि लग्नाआधीच्या कार्यक्रमांनी केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही बरीच चर्चा झाली. त्यांचे लग्न, पोशाख आणि पारंपारिक कार्यक्रम फॅशन आणि शैलीचे प्रतीक मानले जात होते. राधिका आणि अनंतच्या या यशामुळे त्यांना जागतिक शैलीचे प्रतीक बनले आहे.

प्रीवेडिंगपासून लग्नसोहळ्यामुळे रंगली होती चर्चा
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या नावाचाही न्यूयॉर्क टाइम्सने जाहीर केलेल्या मोस्ट स्टायलिश पीपल 2024 च्या यादीत समावेश केला आहे. या प्रतिष्ठित यादीमध्ये त्यांचा समावेश करून, न्यूयॉर्क टाइम्सने लिहिले, "रेड कार्पेट, पॉप्सिकल-आकाराच्या पाचूपासून रिहानापर्यंत, त्यांच्या लग्नाआधीच्या आणि लग्नाच्या उत्सवात सर्वकाही समाविष्ट होते.
यासोबतच न्यूयॉर्क टाइम्सने या जोडप्याचा एक फोटोही शेअर केला आहे, जो त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमातील आहे. या फोटोमध्ये राधिकाने पेस्टल शेडचा हेवी वर्क लेहेंगा घातला आहे, तर अनंत मॅचिंग शेरवानीमध्ये दिसत आहे. त्याच्या राजेशाही शैलीचे जागतिक प्रेक्षकांनी खूप कौतुक केले.
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी व्यतिरिक्त, अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचा 2024 च्या सर्वात स्टायलिश लोकांच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या यादीत समावेश आहे. यामध्ये Beyoncé, Zendaya, Adele, Charli या प्रसिद्ध नावांचा समावेश आहे
अंबानींच्या लग्नाची वर्षभर चर्चा होती
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांनी या वर्षी त्यांच्या नात्याचे लग्नात रुपांतर केले. लग्नापूर्वी, त्यांच्या प्री-वेडिंग इव्हेंटची बरीच चर्चा झाली होती, ज्यामध्ये रिहाना, केटी पेरी, आंद्रिया बोसेली, बॅकस्ट्रीट बॉईज, जस्टिन बीबर आणि डेव्हिड गुएटा सारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
12 जुलै 2024 रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दोघांचे लग्न झाले. या तीन दिवसीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, बोरिस जॉन्सन, टोनी ब्लेअर, जॉन सीना, किम आणि ख्लो कार्दशियन, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, निक जोनास, दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांसारख्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.












Click it and Unblock the Notifications