'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेते संतोष नलावडे यांचं अपघाती निधन
Marathi Actor Santosh Nalawade died : मराठी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अप्पी आमची कलेक्टर' आणि लाखात एक आमचा दादा फेम टीव्ही अभिनेता संतोष हणमंत नलावडे यांचे अपघाती निधन झालं आहे. ते 49 वर्षाचे होते. नांदेड येथे झालेल्या एका भीषण रोड अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.
49 वर्षीय संतोष नलावडे 'लाखात एक आमचा दादा', 'अप्पी आमची कलेक्टर' यासारख्या प्रसिद्ध मालिकांचा भाग होते. नांदेड येथे झालेल्या रस्ते अपघातात संतोष नलावडे यांचे निधन झालं आहे. अपघातात जखमी झाल्यावर संतोष यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र काल (ता. २४ ) फ्रेबुवारी रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष नलावडे हे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील एका विभागात कार्यरत होते. अभिनयाची आवड असल्याने नोकरी करतानाच त्यांनी अभिनय करण्यासही सुरुवात केली. 'अप्पी आमची कलेक्टर', 'मन झालं बाजींद', 'कॉन्स्टेबल मंजू', 'लागीर झालं जी', 'लाखात एक आमचा दादा' यासारख्या मालिकांमध्ये संतोष नलावडे यांनी काम केलं होतं.
संतोष नलावडे हे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील एका विभागात कार्यरत होते. संतोष हे नांदेडमध्ये विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी गेले होते. मात्र, तिथेच एका अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी दुपाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबासह मराठी मनोरंजन विश्वावावर शोककळा पसरली आहे.. त्यांच्या मूळ गावी वाढे (ता. सातारा) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.












Click it and Unblock the Notifications