Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ऑस्करसाठी निवड झालेला किरण रावचा 'लापता लेडीज' ही दुसऱ्या चित्रपटाची कॉपी ? काय आहे दावा घ्या जाणून

Laapataa Ladies in Oscar: चित्रपट निर्माता किरण रावच्या 'लापता लेडीज' या हिंदी चित्रपटाची ऑस्कर 2025 साठी भारतातून निवड झाली आहे.. 2023 मध्ये प्रदर्शित झालेला हा कॉमेडी-ड्रामा असलेल्या चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. किरण राव दिग्दर्शित कमबॅक चित्रपट 'लापता लेडीज' रिलीज झाल्यापासून चर्चेचा विषय बनला होता. केवळ 4 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण 21 कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाला समीक्षकांकडूनही मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळाली आणि OTT वर प्रीमियर झाल्यानंतर तो सर्वाधिक स्ट्रीम करणा-या चित्रपटांपैकी एक बनला.

मात्र या चित्रपटाशी काही वादही निर्माण झाले होते. चित्रपट निर्माते अनंत महादेवन यांनी दावा केला होता की 'लापता लेडीज'ची कथा त्यांच्या 1999 मध्ये आलेल्या 'घुंगट के पट खोल' या चित्रपटातून घेण्यात आली होती. एका मुलाखतीत महादेवनने दावा केला की, चित्रपटातील अनेक दृश्ये त्यांच्या चित्रपटातून प्रेरित आहेत, ज्यात दोन नववधूंच्या अदलाबदलीचा समावेश आहे.

laapataa ladies 2023

'लापता लेडीज' खरोखरच दुसऱ्या चित्रपटाची कॉपी आहे का?

महादेवनने यांनी म्हटलं आहे की "लापता लेडीज मी पाहिला आहे आणि सुरुवातीपासून अनेक क्षण सारखेच आहेत. आमच्या चित्रपटात एक शहरातील मुलगा त्याच्या लग्नासाठी गावी जातो. जेव्हा तो त्याच्या नवीन नवरीला भेटतो तेव्हा खरी गडबड रेल्वे स्टेशनवर होतेय. जेव्हा तो घुंगट असलेल्या आपल्या नववधूला एका बाकावर थांबायला सांगतो. पण जेव्हा तो परत येतो तेव्हा तो चुकीच्या वधूकडे जातो.."

मात्र 'घुंगट के पट खोल'ची कथा 'लापता लेडीज'पेक्षा खूपच वेगळी होती. 'लापता लेडीज'चा शेवट दोन महिलांना त्यांच्या आयुष्याची खरी दिशा मिळाल्याने प्रगतीपथावर झाला. तर 'घुंगट के पट खोल'मध्ये दोन स्त्रिया त्यांच्या 'पती'च्या प्रेमात पडल्या. 1999 च्या या चित्रपटात जॉय सेनगुप्ता, विशाल वर्मा, नेहा पेंडसे आणि सुचेता खन्ना यांनी भूमिका केल्या होत्या.

महादेवन यांनी आमिरच्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे

महादेवनने 'लापता लेडीज'चा निर्माता आमिर खानला 'इश्क', 'अकेले हम, अकेले तुम' आणि 'मन' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अलीकडेपर्यंत हा चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध होता, मात्र तो रहस्यमयपणे गायब झाल्याचा आरोप दिग्दर्शकाने केला होता. तो म्हणाला होता, "'लापता लेडीज'च्या लेखिकेने यूट्यूबवर माझा चित्रपट पाहिल्याचा कोणताही पुरावा माझ्याकडे नाही.

जेव्हा मी यूट्यूबवर माझा चित्रपट शोधला तेव्हा तो गायब झाला आणि तेव्हाच तो काढून टाकल्याचं मला समजलं. मी आमिर (निर्माता) किंवा किरणशी संपर्क साधला नाही. कारण ते फक्त फरक दाखवतील. पण कथेचा आधार, परिस्थिती आणि अनेक दृश्ये सारखीच आहेत. ट्रेन, रेल्वे स्टेशन यातील गडबड, घुंगट घालून आलेला फोटो माझ्या चित्रपटातून थेट आहे. मी ते कौतुक म्हणून घेईन, आणखी काही नाही."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+