Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील टिप्पणीनंतर कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला घ्या जाणून घ

Kunal Kamra Row: प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा नेहमीच त्याच्या स्पष्टवक्त्या आणि तीक्ष्ण राजकीय व्यंगचित्रांसाठी ओळखला जातो. पण यावेळी त्याच्या एका विधानामुळे तो अडचणीत आला आहे. कामराने त्यांच्या नवीन यूट्यूब स्पेशल शो 'नया भारत' मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना 'गद्दार' म्हटलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे.

शिंदे समर्थकांनी त्यांच्या विधानावर जोरदार आक्षेप घेत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कामराचे लोकेशन ट्रॅक करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी ज्या स्टुडिओमध्ये शोचे चित्रीकरण झाले होते, त्या स्टुडिओचीही तोडफोड केली आहे.

kunal kamra

दरम्यान कामरा सध्या तामिळनाडूमध्ये असल्याची माहिती आहे आणि तिथून त्याने मुंबई पोलिसांना जवाब दिला आहे. पण पोलिसांना अपेक्षित असलेले उत्तर मिळाले नाही. कामरा यांनी स्पष्ट केले की, त्याला त्याच्या विधानाबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही आणि न्यायालयाचा आदेश येईपर्यंत तो माफीही मागणार नाहीत. त्यांच्या या भूमिकेमुळे आता संपूर्ण वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कुणाल कामरा काय म्हणाला?

कुणाल कामराने त्याच्या 'नया भारत' या कॉमेडी शोमध्ये 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरुद्ध केलेल्या बंडावर एका लोकप्रिय बॉलिवूड गाण्याचं विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर केलं. मुंबईतील खार परिसरात असलेल्या हॅबिटॅट स्टुडिओमध्ये हा शो रेकॉर्ड करण्यात आला होता.

उद्धव ठाकरेंपासून वेगळे होऊन स्वतःची शिवसेना स्थापन करण्याच्या शिंदे यांच्या निर्णयाची कामरा यांनी खिल्ली उडवली होती. या विडंबनातून त्यांनी शिंदे यांना 'गद्दार' म्हटलं आहे. याबाबत शिंदे गटाने म्हटले की, आमची प्रतिमा मलिन करण्याचे हे षड्यंत्र आहे.

कामराने मुंबई पोलिसांना काय म्हटले?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करताच कामराने स्वतः त्यांच्याशी संपर्क साधला. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, कामराने तामिळनाडूमधून मुंबई पोलिसांना स्पष्ट उत्तर दिले की, न्यायालयाचा आदेश आल्याशिवाय तो माफी मागणार नाही. एवढेच नाही तर, कामराने असेही म्हटले आहे की, जर पोलिसांना हवे असेल तर ते त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करू शकतात जेणेकरून त्यांना कोणत्याही विरोधी पक्षाकडून पैसे मिळालेले नाहीत हे सिद्ध होईल. एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी त्यांला कामावर ठेवल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता.

'स्वातंत्र्याच्या नावाखाली निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही'

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो, परंतु याचा अर्थ असा नाही की, कोणीही निष्काळजीपणे कोणाचाही अपमान करू शकतो." 2024 च्या विधानसभा निवडणुकीने खरा 'गद्दार' कोण आणि खरा 'खुद्दार' कोण हे ठरवले आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले, "लोकांना विनोद आणि व्यंग्य करण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु जाणूनबुजून एखाद्या व्यक्तीचा अपमान करण्याचे स्वातंत्र्य नाही. कुणाल कामरा यांनी संविधानाचे लाल पुस्तक दाखवून त्यांच्या विधानाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला, परंतु हे संविधानाच्या भावनेविरुद्ध आहे."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+