Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुन्हा पदरी निराशा! 'लापता लेडीज' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर, 'संतोष' चित्रपट अजूनही यादीत

Laapata Ladies out in Oscar Race : भारतीयांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली असून आमिर खान निर्मित आणि किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट 97 व्या ऑस्कर पुरस्कार-2025 च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (AMPAS) ने बुधवारी सकाळी याची घोषणा केली. त्यामुळे ऑस्कर मिळण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंग झाले आहे.

2024 साली भारतात सर्वाधिक पसंतीचा चित्रपट ठरलेल्या या चित्रपटाला शेवटच्या 15 चित्रपटांच्या यादीतही स्थान मिळाले नाही. या बातमीनंतर भारतीय चाहते नाराज झाले आहेत.

दुसरीकडे, 'लापता लेडीज' हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार-2025 च्या शर्यतीतून बाहेर पडला असला, तरी 'संतोष' चित्रपट शेवटच्या 15 मध्ये जाण्यात यशस्वी झाला. मात्र, ब्रिटीश-भारतीय दिग्दर्शक संध्या यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे.

Laapata Ladies out in Oscar Race

कधी होणार ऑस्कर पुरस्कार सोहळा

ऑस्कर पुरस्कार सोहळा 2 मार्च 2025 ला होणार आहे 'लापता लेडीज' हा चित्रपट परदेशी श्रेणीतील पुरस्कारासाठी पाठवण्यात आला होता. 23 सप्टेंबर रोजी, फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ऑस्कर 2025 मध्ये पाठविण्याची घोषणा केली होती. ऑस्कर पुरस्कारासाठीची नामांकने 17 जानेवारीला जाहीर होणार आहेत. त्याचबरोबर ऑस्कर पुरस्कार सोहळा 2 मार्चला होणार आहे. यामध्ये विजेते घोषित केले जातील.

आतापर्यंत या चित्रपटांचे झाले आहे नामांकन

आत्तापर्यंत भारतातून 'मदर इंडिया', 'सलाम बॉम्बे' आणि 'लगान' या तीन चित्रपटांना ऑस्करच्या परदेशी चित्रपटश्रेणीत नामांकन मिळाले आहे. मात्र एकाही चित्रपटाला पुरस्कार मिळू शकला नाही. 'लापता लेडीज'च्या नॉमिनेशननंतर अनेकांना वाटले होते की, यावेळी हा पुरस्कार भारतात येईल पण यावेळीही हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

सुनीता राजवार यांच्या 'संतोष'चा अजूनही यादीत समावेश

तथापि, ब्रिटीश-भारतीय चित्रपट निर्मात्या संध्या सुरी यांच्या शहाना गोस्वामी आणि सुनीता राजवार यांच्या 'संतोष' चित्रपटाने यूकेचे प्रतिनिधित्व केले आहे. या चित्रपटाचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

या यादीत फ्रान्सची 'एमिलिया पेरेझ', 'आय एम स्टिल हिअर' (ब्राझील), 'युनिव्हर्सल लँग्वेज' (कॅनडा), 'वेव्ह्स' (झेक रिपब्लिक), 'द गर्ल विथ द नीडल' (डेनमार्क) आणि जर्मनीची नावे आहेत. जसे 'द सीड ऑफ द सेक्रेड फिग' देखील समाविष्ट आहे.

'लापता लेडीज' ची कथा काय आहे?

'लापता लेडीज' चित्रपटाची ची कथा ही 2001 मध्ये निर्मल प्रदेश नावाच्या काल्पनिक राज्यावर आधारित आहे. जिथे दोन नववधू ट्रेनमध्ये अडकतातआणि एकीला दुसरीचा नवरा घेऊन जातो. ते फक्त एका स्टेशनवर सोडले जाते. यानंतर एक पोलीस अधिकारी हे प्रकरण हाताळतो आणि त्यानंतर दोन्ही मुली आपापल्या ठिकाणी जातात.

किरण राव दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली होती. चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन तसेच छाया कदम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट जरी ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी या चित्रपटाचं प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून खूप कौतुक केलं गेलं होतं!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+