Kiara Advani Pregnant : कियारा अन् सिद्धार्थ आई-बाबा होणार, खास पद्धतीने चाहत्यांना दिली गुड न्यूज
Kiara Advani Pregnant : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. आता, त्या जोडप्याच्या घरी एक छोटासा पाहुणा येणार आहे. ॉ
अर्थात या जोडप्याने एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कियारा गर्भवती आहे आणि या जोडप्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना गोड न्यूज शेअर केली आहे. लवकरच त्यांच्याकडे गोड बाळ येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

इंन्स्टाग्रामवर कियाराने पोस्ट शेअर करत खूप गोड बातमी शेअर केली.
इंस्टाग्रामवर शेअर केली पोस्ट
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी 28 फेब्रुवारी रोजी इंस्टाग्रामवर त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली. या जोडप्याने शेअर केलेल्या गोंडस पोस्टमध्ये, त्यांचे दोन्ही हात दिसत आहेत आणि त्यांनी पांढऱ्या रंगाचे बेबी मोजे धरले आहेत. हा फोटो शेअर करताना या जोडप्याने कॅप्शनमध्ये लिहिले.
चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
'आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट लवकरच येत आहे.' यासोबतच हृदय आणि व्हाईट डोळ्याचे इमोजी देखील जोडले गेले आहेत. या जोडप्याच्या या घोषणेनंतर त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सर्वजण या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.












Click it and Unblock the Notifications