Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'केसरी 2' साठी अक्षय कुमारने किती मानधन घेतले? 100 की 145 कोटी! काय आहे सत्य, घ्या जाणून

Kesari 2 : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत आहे. 'केसरी 2' हा चित्रपट आजपासून चित्रपटगृहात रिलीज आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी ही चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच अक्षयने चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनाबाबत आता मोठी चर्चा सुरू झाली आहे.

अक्षयने करण जोहरकडून या चित्रपटासाठी प्रचंड मोठी रक्कम स्वीकारली असल्याची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट जलियांवाला बाग हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर आधारित असून अक्षयने या चित्रपटात शंकरन नायर यांची भूमिका साकारली आहे. अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षयने 'केसरी 2' चित्रपटासाठी 60 ते 145 कोटी रुपये फी घेतली असल्याचे अंदाज लावले जात आहेत.

kesari 2

'केसरी 2' हा चित्रपट करण जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शन्सद्वारे निर्मित करण्यात आला असून करण सिंग त्यागी यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 1999 च्या जलियांवाला बाग हत्याकांडाच्या घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने वकील शंकरन नायर यांची भूमिका साकारली आहे.

शंकरन नायर हे ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढणारे एक धाडसी वकील होते, ज्यांनी या हत्याकांडानंतर न्याय मिळवण्यासाठी कोर्टात लढा दिला. चित्रपटात आर. माधवन आणि अनन्या पांडे यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 18 एप्रिल 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद असल्याचे दिसत आहे.

'केसरी 2' साठी अक्षय कुमारने घेतली मोठी रक्कम!

फोर्ब्सच्या रिपोर्टवर विश्वास ठेवायचा झाला तर अक्षय कुमार एका चित्रपटासाठी 60 ते 145 कोटी रुपये घेतो. 'केसरी 2' साठीही त्याने एवढीच रक्कम घेतली असेल असं म्हटलं जात आहे. मात्र गेल्या वर्षी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना अक्षय कुमारने सांगितले होते की, तो चित्रपटांसाठी फी घेत नाही तर चित्रपटात एकूण झालेल्या कमाईच्या नफ्यात वाटा घेतो.

अक्षय कुमारने म्हटलं होत की, जर चित्रपट यशस्वी झाला तर तो नफ्यात वाटा घेतो पण जर चित्रपट फ्लॉप झाला तर आम्हाला पैसे मिळत नाहीत. त्याच्या या बोलण्यामुळे असं म्हटलं जात आहे की,अक्षय कुमारने 'केसरी चॅप्टर 2' चित्रपटासाठी कोणतेही फी घेतले नसेल परंतु नफ्यात वाटा घेतला असणार आहे. तसेच या चर्चांवर निर्माते आणि अक्षय कुमारकडून अद्याप कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार अक्षय कुमारने 'स्काय फोर्स'साठी सुमारे 70 कोटी रुपये घेतले होते.

अक्षय कुमारने आपल्या करिअरमध्ये नेहमीच आर्थिक आणि व्यावसायिक निर्णयांमध्ये सावध पावले उचलली आहेत. गेल्या काही वर्षांत 'स्काय फोर्स' आणि 'बडे मियाँ छोटे मियाँ' यांसारख्या चित्रपटांसाठी अक्षयने 70 ते 80 कोटी रुपये फी घेतली होती. परंतु, 'केसरी 2' साठी त्यांनी प्रॉफिट-शेअरिंगचा पर्याय निवडला असल्याचं बोललं जात आहे.

Take a Poll

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+