katrina kaif : कतरिना कैफ अन् विकी कौशलची अधिकृत घोषणा, म्हणाले- आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय!
katrina kaif vicky kaushal official pregnancy announcement : बॉलिवूडची आवडती जोडी, कतरिना कैफ आणि विकी कौशल, त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहेत, एका आनंदी नवीन अध्यायात पाऊल ठेवत आहेत ज्याचा आनंद चाहते आणि चित्रपट जगत त्यांच्यासोबत साजरा करत आहे.
बाॅलीवूडची खास जोडी आणि अनेकांच्या दिलाची धडकन असलेले कतरिना कैफ आणि विकी कौशल आता आई वडील होणार आहेत. या जोडीने सोशल मीडियावर अधिकृतरित्या घोषणा केली असून लवकरच ते आई-बाबा होण्याची वाट पाहत आहे. कतरिना कैफ ही गर्भवती असून आज २३ सप्टेंबर २०२५ रोजी याबाबत या जोडीने खास फोटो शेअर करत पोस्ट केली आहे.

बाॅलीवूडची सुंदर नटी आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली कतरिना कैफ आणि शांत, सुस्वभावी आणि समंजस दिग्गज अभिनेता विकी कौशल यानी विवाह केल्यानंतर त्यांचा संसार सुखाने सुरु झाला आहे. आता या दोघांच्या घरात तिसरी गोंडस व्यक्ती येणार आहे.
"आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय"
पहिल्यांदा आई-बाबा होण्याची वाट पाहणारे कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी आमच्या आयुष्यातील हा सर्वोत्तम अध्याय आहे असे म्हटले आहे. या जोडप्याने लिहिले की, "आनंद आणि कृतज्ञतेने भरलेल्या हृदयांसह आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय सुरू करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत." सोशल मीडियावर ही पोस्ट केल्यानंतर दोघांचेही चाहते, मित्र आणि सर्वच जणांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आणि मोठ्यांनी आशीर्वाद दिले आहेत.
स्टारकास्टकडूनही शुभेच्छांचा वर्षाव
बाॅलीवूडमधील स्टारकास्ट जान्हवी कपूर, झोया अख्तर, भूमी पेडणेकर, ओरी, आयुष्मान खुराणा, सिद्धांत चतुर्वेदी आणि इतरांनी विकी आणि कतरिनाच्या पोस्टवर कमेंट केली आणि मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ गर्भवती असल्याबाबत चर्चा होत्या, यासंदर्भात माध्यमांतही वृत्त आले होते, आता या जोडीने खुद्द ही माहिती स्वःत शेअर केली आहे. त्यामुळे आता रसिकांपर्यंत ठोस माहिती आली असून आता चाहत्यांनाही कतरिना आणि विकी कौशलच्या घरी पाळणा कधी हलणार याची उत्सुकता आहे.
राजस्थानमध्ये झाले होते विकी कतरिनाचे लग्न
प्राप्त माहितीनुसार, डिसेंबर २०२१ मध्ये राजस्थानमध्ये एका स्वप्नाळू समारंभात लग्न झालेल्या कतरिना आणि विकी बॉलीवूडमधील सर्वात खास जोड्यांपैकी एक आहेत. गेल्या तीन वर्षांत, रेड कार्पेटवर आणि इंस्टाग्रामवर स्पष्ट झलकांमध्ये त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना सतत मोहित करत आहे. गरोदरपणाच्या बातम्यांनी आता त्यांच्या प्रेमकथेत आणखी एक मैलाचा दगड जोडला आहे.
विकी कौशलची खूप झाली चर्चा
प्रसिद्ध अभिनेता असलेला विकी कौशल याने लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा ब्लाॅक ब्लस्टर चित्रपट केला, त्यात त्याची दमदार भूमिका होती.त्याच्या भुमिकेला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या चित्रपटाने त्याला आणखीनच प्रसिद्ध केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमिकेत तो तर खासच दिसत होता. या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई करत विक्रम केले आहेत. तर 'टायगर ३' सारख्या हिट चित्रपटांसह कतरिना बॉलीवूडची टॉप स्टार आहे. आता चाहते हे जोडपे कधी आई-बाबा होतात याचीच वाट पाहत आहे, तर दुसरीकडे दोघांनी अधिकृत घोषणा करताच सोशल मीडियावर उत्साह, मीम्स आणि हृदयस्पर्शी पोस्ट येत आहेत.












Click it and Unblock the Notifications