Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ccl 2025 : सुदीपच्या नेतृत्त्वाखाली कर्नाटक बुलडोझर्सचा दमदार विजय; तेलगू वाँरियर्सवर ४६ धावांनी मात

सेलिब्रिटी क्रिकेट लीग-२०२५ ला अर्थात स्पर्धेच्या अकराव्या हंगामाला कालपासून जोशात सुरुवात झाली. या स्पर्धेत आठ संघांचा समावेश आहे. बॉलिवूड, टॉलिवूड, कॉलिवूड आणि इतर चित्रपटाशी संबंधीत कलाकारांची ही स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेत एक वेगळाच उत्साह पहायला मिळत आहे. यंदाचा अकरावा हंगाम ८ फेब्रुवारी रोजी सुरू झाला आणि तो २ मार्चपर्यंत चालणार आहे.

Ccl 2025

पहिल्या दिवसाचे सामने

या स्पर्धेतील पहिला सामना काल बंगाल टायगर्स विरुद्ध चेन्नई रायनोज यांच्यात रंगला. या हंगामात चार टप्प्यात एकूण १७ सामने रंगणार आहेत. बेंगळुरु, दिल्ली, हैदराबाद आणि सुरत येथे हे सामने खेळविले जात आहे. या सर्धेत काल दुसरा सामना बेंगलूरमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविला गेला. त्यात कर्नाटक बुलडोझर्सने तेलगू वाँरियर्सवर ४६ धावांनी विजय मिळवला.

कसा झाला सामना?

- तेलुगू वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- कर्नाटक बुलडोझर्स: पहिल्या डावाच्या शेवटी ११३/३ धावा केल्या.
- तेलुगू वॉरियर्स: दुसऱ्या डावाच्या शेवटी ९९/५ धावा केल्या.
- कर्नाटक बुलडोझर्स: तिसऱ्या डावाच्या शेवटी १२३/३ धावा केल्या.
- तेलुगू वॉरियर्स: ९१/९ धावा केल्या.
- कर्नाटकने हा सामना ४६ धावांनी जिंकला.

कर्नाटक बुलडोझर्सचा संघ : सुदीप (कर्णधार) प्रदीप, तरुण चंद्र, चिरंजीवी सर्जा, जय कार्तिक, प्रसन्ना, अभिमन्यू, भास्कर, राहुल, राजीव, धर्मा, सौरव, तरुण सुधीर, विश्वास, दर्शन सेभरतना, शाम, बोस वेंकट, हेमचंद्रन, कलैयर्सन, महेंद्रन, नंदा, पृथ्वी, रमन, संजय भारती, शंतनू, शरण, उदय कुमार, विक्रांत, विष्णू.

तेलुगू वॉरियर्सचा संघ: अखिल अक्किनेनी वेंकटेश (कर्णधार), सचिन जोशी, सुधीर बाबू, तरुण, प्रिन्स सेसिल, साई धरम तेज, अजय, ईएसडी, अश्विन बाबू, आदर्श बालकृष्ण, नंदकिशोर, निखिल, सिद्धार्थ, प्रभु, रघु, सुशांत, श्रीकांत, तारक रत्न, सम्राट रेड्डी, विश्वा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+