Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'जर तुम्ही 8 तासांत उत्तर दिले नाही तर!', कपिल शर्मा, राजपाल यादव, रेमू डिसूझाला ठार मारण्याची धमकी!

Kapil Sharma Remu D'Souza Rajpal Yadav receive death threats: प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. कपिल शर्माला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचं वृत्त आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत. कपिल शर्मासह रेमू डिसूझा आणि प्रसिद्ध विनोदी कलाकार राजपाल यादव यांनाही धमक्या आल्या आहेत.

16 जानेवारी 2025 रोजी कपिल शर्माला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. एकीकडे सैफ अली खान याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. सध्या तो बरा असून रुग्णालयातून घरी परतला आहे. हे प्रकरण शमत असतानाच आता बाॅलीवूडमध्ये पुन्हा खळबळ माजली आहे. आता कपिल शर्माच्या आणि राजपाल यादव, रेमू डिसूजा यांच्या धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे.

Kapil Sharma Remu D Souza Rajpal Yadav receive death threats

कपिल शर्माच्या सहकाऱ्यांनाही धमक्या मिळाल्या

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्मा व्यतिरिक्त त्याचा सहकारी सुगंधा मिश्रा, जवळचा मित्र अभिनेता राजपाल यादव आणि कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूजा यांनाही धमकीचे ईमेल आले आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यांना 22 जानेवारी 2025 रोजी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. कॉमेडियनला ही धमकी ईमेलद्वारे मिळाली आहे. आता पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

राजपाल यादवतर्फे पोलिसांत तक्रार

कपिल शर्माच्या कुटुंबापासून ते त्याच्या चाहत्यांपर्यंत सगळेच या धमकीने धास्तावले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या धमकीच्या मेसेजमध्ये कपिल शर्माचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. या प्रकरणी राजपाल यादव यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे, तर सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसूझा यांनीही याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

धमकीचा ई-मेल पाकिस्तानातून

अंबोली पोलिसांनी राजपाल यादव यांच्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारे एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीएनएस कलम 351(3) अन्वये एफआयआर नोंदवला आहे. पाकिस्तानातून धमकीचे ई-मेल पाठवण्यात आले असून, या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हे धमकीचे ईमेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आल्याचे सध्या समोर आले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून सेलिब्रिटींना धमकीचे मेल पाठवण्यात आले आहेत. मेल पाठवणाऱ्याने त्याचे नाव विष्णू बाया असे दिले आहे. सेलिब्रेटींच्या अलीकडच्या घडामोडींवर ते लक्ष ठेवून असल्याचा दावा या ईमेलमध्ये करण्यात आला आहे.

धमकी देणाऱ्या ई-मेलमध्ये काय लिहिले?

धमकीच्या ई-मेलमध्ये लिहिलेले आहे- आम्ही तुमच्या अलीकडील कृतींचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की एक संवेदनशील बाब तुमच्या लक्षात आणून देणे महत्त्वाचे आहे. हा पब्लिसिटी स्टंट किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नाही. आपण हा संदेश गांभीर्याने घ्यावा ही विनंती.

  • मागण्या पूर्ण न केल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकीही ईमेलमध्ये देण्यात आली आहे. यामध्ये 24 तासांत उत्तर देण्याची मागणी करण्यात आली असून, इशाराही देण्यात आला आहे.
  • आम्हाला कोणतेही उत्तर न मिळाल्यास तुम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचा समज करून आम्ही आवश्यक ती कारवाई करू, असेही लिहिले आहे.

कपिल शर्माने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही

कपिल शर्माला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याच्या बातमीवर कॉमेडियन किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अद्याप भाष्य केलेले नाही. तसेच कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+