Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Kantara Chapter 1 : रिलीजपूर्वीच कांतारा चॅप्टर-1 ची कोट्यवधींची कमाई, सनी संस्कारी टाकले मागे!

Kantara Chapter 1 Advance Booking Rishab Shetty : अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कांतारा: चॅप्टर १' च्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'कांतारा' (२०२२) या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता त्याचा प्रीक्वल येत आहे.

ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने आधीच प्रेक्षकांना भुरळ घातलेली आहे. आता ॲडव्हान्स बुकिंगच्या आकडेवारीने चित्रपटाला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद सिद्ध केला आहे.

२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालेली आहे आणि त्याने कमाईचे नवीन विक्रम करण्यास सुरुवात केली आहे.

Kantara Chapter 1 Advance Booking

'कांतारा चॅप्टर १' ची ॲडव्हान्स बुकिंगमधील कमाई

कर्नाटक आणि अमेरिकेतील चाहत्यांनी सुरुवातीपासूनच या चित्रपटात मोठा रस दाखवला आहे. २८ सप्टेंबर रोजी उत्तर भारतात बुकिंग विंडो उघडल्यानंतर, प्री-तिकीट विक्रीदरम्यान त्याला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

Sacnilc च्या आकडेवारीनुसार, 'कांतारा: चॅप्टर १' ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये लक्षणीय कमाई केली आहे. कोणत्या भाषेत किती बुकिंग झाली, याची आकडेवारी देखील समोर आली आहे.

भाषा प्री-विक्री झालेली तिकिटे
कन्नड १,२३,४७४
तेलुगू ११२
हिंदी १२,५८३
तमिळ ५६२
मल्याळम २,४८०

या आकडेवारीनुसार, 'कांतारा: चॅप्टर १' ने देशभरात ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ₹४.९९ कोटी रुपये कमावले आहेत. ब्लॉक केलेल्या जागांसह त्याचे प्री-तिकीट विक्री संकलन ₹८.४२ कोटींवर पोहोचले असल्याचे सांगितले जात आहे.

'सनी संस्कारी'ची तुलसी कुमारी'ला टाकले मागे!

'कांतारा चॅप्टर १' च्या ॲडव्हान्स बुकिंगचा वेग इतका जबरदस्त आहे की, त्याने इतर मोठ्या बॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने त्याच वेळी रिलीज होणाऱ्या वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या 'सनी संस्कारींची तुलसी कुमारी' या चित्रपटाला प्री-तिकीट विक्रीत खूप मागे टाकले आहे.

  • कांतारा चॅप्टर १ ₹४.९९ कोटी ₹८.४२ कोटी
  • सनी संस्कारींची तुलसी कुमारी ₹३३.६५ लाख ₹१.११ कोटी

सोमवार दुपारपर्यंत 'सनी संस्कारींची तुलसी कुमारी' ची देशभरात फक्त ६,४१८ तिकिटे प्री-बुक झाली आहेत, तर 'कांतारा: चॅप्टर १' चा आकडा कोट्यवधींच्या घरात आहे. यावरून स्पष्ट होते की, दक्षिण भारतीय चित्रपटांचा 'पॅन-इंडिया' प्रभाव अजूनही कायम आहे.

'कांतारा चॅप्टर १' वन सात भाषांमध्ये होणार रिलीज!

'कांतारा चॅप्टर १' हा मूळ कन्नड भाषेत बनवलेला एक पॅन-इंडिया चित्रपट आहे. ऋषभ शेट्टी यांनीच याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे, तर होम्बाले फिल्म्सने याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ रोजी जगभरात २डी आणि आयमॅक्स फॉरमॅटमध्ये कन्नड, हिंदी, तेलगू, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी या सात भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'कांतारा'च्या पहिल्या भागाच्या अभूतपूर्व यशानंतर, प्रेक्षक आता त्याच्या मूळ कथेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+