Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Kangana Ranaut ज्याच्यावर भडकली तो Zohran Mamdani कोण आहे?, हिंदू धर्मावरुन काय केला आरोप?

Kangana Ranaut Zohran Mamdani : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत पुन्हा एकदा तिच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आली आहे.

परंतु, यावेळी त्यांनी कोण्या एका भारतीयवर किंवा भारतातील कोणा नेत्यावर टीका केलेली नाही. यावेळी कंगना थेट विदेशात राहणाऱ्या एका व्यक्तीवर कडाडल्या आहेत. ज्यांचा भारतीयांशी संबंध आहे.

कंगनाने न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या प्रसिद्ध भारतीय वंशाच्या चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचा मुलगा जोहरन ममदानी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

Kangana Ranaut criticizes Zohran Mamdani

कंगना राणौतने जोहरन ममदानी यांच्या नावावर आणि ओळखीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही, तर त्यांच्यावर हिंदू धर्म नष्ट करण्याचा हेतू असल्याचा आरोपही केला. कंगना राणौत म्हणाली की, जोहरन ममदानी भारतीयांपेक्षा जास्त पाकिस्तानीच वाटतो.

दुसरीकडे कंगनाने मीरा नायर यांच्या कामाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले, तर त्यांचा मुलगा जोहरन ममदानीवर हल्ला चढवला आणि लिहिले की तो "आता हिंदू धर्म नष्ट करण्याच्या डावात तो गुंतला आहे.

'आता ते हिंदू धर्म मिटवण्याच्या तयारीत'

कंगना राणौतने ट्विटरवर जोहरान ममदानीविरुद्धची पोस्ट शेअर केली, लिहिले की, "त्याची आई मीरा नायर आपल्या देशाची एक महान चित्रपट निर्माता आहे, पद्मश्री आहे, ती भारताची प्रसिद्ध कन्या आहे. तिने गुजराती वंशाचे प्रसिद्ध लेखक महमूद ममदानी यांच्याशी लग्न केले.

परंतु, त्यांच्या मुलाचे नाव 'जोहरान ममदानी' ठेवले जे भारतीय नसून पाकिस्तानी वाटते. त्यांच्या हिंदू रक्ताचे किंवा ओळखीचे काय झाले? आणि आता ते हिंदू धर्म मिटवण्याच्या तयारीत आहेत? व्वा!! सगळीकडे हीच कथा आहे."

कंगना राणौतने ही प्रतिक्रिया एका ट्विटवर दिली ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की, जोहरान ममदानी एकदा टाइम्स स्क्वेअरमध्ये निदर्शकांच्या गर्दीचे नेतृत्व करत होता ज्यांनी हिंदूंविरुद्ध अपमानास्पद टीका केली होती तसचे आणि भगवान रामांचा अपमान देखील केला होता.

कोण आहे जोहरान ममदानी?

जोहरान ममदानी, 33 वर्षांचा तो भारतीय-अमेरिकन चित्रपट निर्माता मीरा नायर आणि लेखक महमूद ममदानी यांचा मुलगा आहे. तो एक समाजवादी नेता आहे आणि अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक सोशलिस्टशी संबंधित आहे. सध्या न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत आणि जर ते जिंकले तर ते शहराचे पहिले मुस्लिम महापौर बनू शकतात. त्यांचा सामना न्यू यॉर्कचे माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांच्याशी झाला होता, जे आधीच शर्यतीतून माघार घेत आहेत.

ट्रम्प यांनीही जोहरान ममदानींवर साधला निशाणा!

जोहरान ममदानी केवळ भारतातच नव्हे तर अमेरिकेतही वादाचे केंद्रबिंदू बनले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर त्यांना "100% कम्युनिस्ट वेडा" असे संबोधून त्यांच्यावर हल्ला चढवला.

ट्रम्प यांनी लिहिले, "तो दिसायलाही भयानक आहे, त्याचा आवाज भेदक आहे, त्याच्याकडे बुद्धिमत्तेचा अभाव आहे. त्याला एओसी आणि इतर मूर्खांचा पाठिंबा आहे. आणि आमचे महान 'पॅलेस्टाईन प्रेमी' सिनेटर चक शूमर देखील त्यांच्यापुढे नतमस्तक होत आहेत!"

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+