बघा, प्रभासचे असे चित्रपट ज्यांनी पहिल्याच दिवशी केली बंपर कमाई
Mumbai: सध्या सर्वत्र कल्की2898 एडी या चित्रपटाची चर्चा होत आहे. हा चित्रपट आज 27 जून रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे.ऍडव्हान्स बुकिंग करून या चित्रपटाला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडेही रात्री उशिरापर्यंत समोर येतील.
दरम्यान, कल्की2898 एडी हा चित्रपट पहिल्याच दिवशी प्रभासच्या मागील अनेक चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईला मागे टाकू शकतो असे मानले जाते आहे. मात्र, ताज्या आकडेवारीनंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. आज आम्ही तुम्हाला प्रभासच्या त्या चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली होती.

बाहुबली २
या यादीत पहिल्या क्रमांकावर प्रभासच्या कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपट आहे, बाहुबली 2. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर कमाईचे अनेक विक्रम केले. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बंपर कमाई केली होती. एसएस राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात १२१ कोटी रुपयांची कमाई केली.
सालार
प्रभासचा सालार हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळेच हा चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटगृहांमध्ये प्रभासच्या चाहत्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ भारतात 90.7 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले होते.
साहो
या यादीत साहो चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन सुजीत यांनी केले होते. 2019 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट ॲक्शन थ्रिलर होता. यामध्ये कलाकार जोरदार भांडताना दिसले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली होती. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 89 कोटींची कमाई केली होती.
आदिपुरुष
प्रभासचा आदिपुरुष भलेही फ्लॉप ठरला असेल, पण बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली सुरुवात केली होती. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 86.75 कोटींची कमाई केली आहे. त्याचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले होते. यापूर्वी ओम राऊत यांनी ताना जी द अनसंग वॉरियर सारखे चित्रपट दिग्दर्शित केले होते.
कल्की2898 एडी या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, कमल हासन अशी तगडी स्टारकास्ट आहे. तगड्या स्टारकास्टमुळे या चित्रपटाची मोठी चर्चा झाली होती. कल्की2898 एडीमध्ये आजवर कधीही न पाहिलेली एक अद्भूत दुनिया दिसतेय. आज हा सिनेमा भारतात रिलीज झालाय. या चित्रपटात साऊथ आणि बॉलिवूडचा खास संगम पाहायला मिळतोय.












Click it and Unblock the Notifications