सोनाक्षी सिन्हाच्या 'काकुडा'चा थ्रिलर ट्रेलर रिलीज, जाणून घ्या चित्रपट कधी बघायला मिळणार?

बॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट 'स्त्री'च्या निर्मात्यांच्या 'मुंज्या' हा हॉरर-कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता आणि आता या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार 'काकुडा' हा आगामी चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाबद्दल लोक खूप उत्सुक असल्याचे दिसत आहे.

'काकुडा'चा फनी ट्रेलर रिलीज

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा मजेदार आणि थ्रिलर अशा स्वरुपाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, जो लोकांना खूप आवडला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला भीती वाटेल आणि हसूही येईल. सोनाक्षी सिन्हा, रितेश देशमुख आणि साकिब सलीम स्टारर 'काकुडा'चा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

kakuda movie release date

रातोडी या शापित गावाची कहाणी

'काकुडा'च्या ट्रेलरमध्ये रातोरी हे शापित गाव दाखवण्यात आले आहे, जिथे प्रत्येक घराला दोन दरवाजे आहेत. एक मोठा आणि दुसरा लहान. छोटा दरवाजा काकुडाचा आहे, जो दर मंगळवारी संध्याकाळी 7.15 वाजता येतो आणि जो कोणी त्याच्यासाठी दार उघडे ठेवत नाही, त्याची कहाणी 13 व्या दिवशी संपते.

12 जुलैला प्रदर्शित होणार

चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर लोक त्यावर भरभरून कमेंट करत आहेत. हा चित्रपट थिएटरमध्ये नाही तर हा चित्रपट 12 जुलै 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

'रातोरीचं रहस्य उलगडणार का आणि काकुडाचा शाप काय?'

चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे- रातोरीचे रहस्य उघड होईल आणि काकुडाचा शाप काय आहे. आता दर मंगळवारी संध्याकाळी 7.15 वाजता दार उघडे ठेवा कारण काकुडा येणार आहे. लोक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आदित्य-रितेशची हिट जोडी पुन्हा एकत्र

आदित्य आणि रितेशचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी माऊली या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. रितेशची मु्ख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्यने केले होते. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आदित्य सरपोतदारने मराठीत दिग्दर्शित केलेले चित्रपट चांगलेच यशस्वी ठरले. 'नारबाची वाडी', 'उलाढाल', 'झोंबिवली', 'सतरंगी रे', 'माऊली' आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+