Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जया बच्चन यांचा 'हा' शीघ्रकोप पाहिलाय का? वयस्कर महिला फॅनला काढले हात धरुन बाहेर, पहा व्हिडीओ...

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या त्यांच्या रागीट स्वभामुळे कायम चर्चेत असतात. अनेकदा त्या फोटोग्राफर्सवर रागावलेल्या किंवा ओरडलेल्याही दिसल्या आहेत. रविवारी पुन्हा एकदा जया बच्चन त्यांच्या एका कृतीमुळे चांगल्याच चर्चेत आल्या. मनोज कुमार यांच्या प्रार्थना सभेत त्यांनी त्यांच्याच वयाच्या एका चाहत्यावर प्रचंड संताप व्यक्त केला. एवढंच नाही तर, फोटोसाठी हात हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या वयस्कर फॅनला त्यांनी थेट हाताला धरुन बाहेर काढलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी जया बच्चन यांच्या या कृतीवर संतापही व्यक्त केला आहे.

Jaya Bachchan s angry video

नेमकं काय झालं?

रविवारी मुंबईत ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांची प्रार्थना सभा होती. या सभेला बाॅलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार श्रद्धांजली अर्पण करायला उपस्थित होते. याच कार्यक्रमात जया बच्चन याही उपस्थित होत्या. या कार्यक्रमात एक वयस्कर महिला जया बच्चन यांच्या खांद्यावर थाप देते. त्यांचा हात हातात घेऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी एक व्यक्तीही त्या महिलेसोबत असतो व तो फोटो घेण्याचा प्रयत्न करतो. जया बच्चन यांना हे सगळं आवडत नाही. मुळात त्या महिलेने त्यांच्या खांद्यावर टाकलेल्या हात जया बच्चन झटकून टाकतात. त्यानंतर त्या महिलेचा हात हातात घेऊन तिला थेट बाहेर जाण्यास सांगतात.

व्हिडीओ झाला व्हायरल

जया बच्चन यांचा रागीट स्वभाव सर्वश्रूत आहे. मात्र त्यांनी त्यांच्याच वयाच्या एका महिला फॅनसोबत केलेले कृत्य अनेकांना आवडलेले नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.अनेकांनी जया बच्चन यांच्यावर राग व्यक्त केला तर अनेकांनी जया बच्चन यांच्या कृतीचे समर्थनही केले. जया बच्चन यांच्या या वागण्यावर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी त्याचे वर्तन असभ्य म्हटले, तर काहींनी त्याचे समर्थन करत म्हटले की फोटो मागण्याची ही योग्य वेळ नाही. एका वापरकर्त्याने कमेंट केली, "मला वाटत नाही की ती भेटण्याचा प्रयत्न करत होती, तर ती जयासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत होती. अंत्यसंस्कार हे फोटो काढण्यासाठी योग्य ठिकाण नाही."

नेटकऱ्यांनी जया बच्चन यांना पाठिंबा

दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, "जया देखील शांतपणे बोलू शकली असती." अनेकांनी जया बच्चन यांच्या स्वभावच तसा असल्याचे म्हटले. दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, "मला माफ करा, पण तुम्ही अंत्यसंस्कार हे फोटो मागण्यासाठी योग्य ठिकाण आहे असे कसे विचारू शकता?" दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, "प्रार्थना सभेत फोटो काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बाहेर काढले पाहिजे. यावेळी, जया बरोबर आहे."

सेलिब्रिटींनी लावली हजेरी

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे ४ एप्रिल रोजी सकाळी मुंबईतील एका रुग्णालयात निधन झाले. ५ एप्रिल रोजी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवार, 6 एप्रिल रोजी झालेल्या प्रार्थना सभेला आमिर खान, आशा पारेख, रमेश सिप्पी, राकेश रोशन, हनी इराणी, डेव्हिड धवन, जॉनी लीव्हर, जावेद जाफरी, सुभाष घई, अरुणा इराणी, रणजीत, शेखर सुमन, अशोक पंडित, विंदू दारा सिंग, मुकेश खान ऋषी, ऋषी कुमार, इंद्रकुमार सिंह, इंद्रकुमार सिंह, इंद्रकुमार सिंह उपस्थित होते. सोनू निगम, उदित नारायण आणि अनु मलिक यासारखे दिग्गज उपस्थित होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+