Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'तू कपडे काढून का बसत नाही?'; दिग्दर्शक साजिद खानवर 'या' अभिनेत्रीने केला आरोप, केले होते 50 SMS

Ishqbaaz fame Navina Bole accuses Sajid Khan : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि फराह खानचा भाऊ साजिद खान आता अडचणीत सापडला आहे. Me Too चळवळीनंतर बाॅलीवूड हादरले होते. अनेक अभिनेत्रींनी आरोपाच्या फैरी झाडत कास्टींग काऊच्या त्या कशा शिकार बनल्या हे पुढे आणले होते, यानंतर आता 'इश्कबाज'मधील भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेली टीव्ही अभिनेत्री नवीना बोले हिने साजिद खानशी संबंधित एक मोठा आरोप केला आहे.

Ishqbaaz fame Navina Bole

टीव्ही अभिनेत्री असलेली नविना बोले हिने आपला धक्कादायक अनुभव सर्वांसमोर शेअर केला आहे. हा खुलासा वर्षापूर्वी घडलेल्या एका घटनेचा असला तरी या खुलाशामुळे बाॅलीवूडमध्ये खळबळ माजली आहे आणि तो धक्कादायक आहे. नुकताच घटस्फोट घेतलेल्या नवीनाने एका मुलाखतीत साजिद खानसोबतचा तिला आलेला वाईट अनुभव शेअर केला.

काय म्हणाली नविना बोले?

नुकताच नविनाने सुभाषित घोष यांना मुलाखत दिली. यात नवीनाने साजिद खानबद्दल काही धक्कादायक वक्तव्यं केली. ती म्हणाली, "एक भयानक माणूस ज्याला मला आयुष्यात कधीच भेटायचे नाही. साजिद खान असे त्याचे नाव आहे. त्यांनी अनेक लोकांच्या मागे जाऊन महिलांचा अपमान करण्यात कोणतीही कसर सोडली नाही." असे ती म्हणाली.

" कपडे काढून..." नविनाने व्यक्त केला तो अनुभव

नविना म्हणाली, अरे बेबी दरम्यान मला घरी बोलावले. तेव्हा मी खूप उत्साही होते. मग तो मला म्हणाला की तू तुझे कपडे काढून अंतर्वस्त्रामध्ये का बसत नाहीस? तु किती इझी आहे हे मला पहायचे आहे. मी ही गोष्ट 2004 आणि 2006 बद्दल बोलत आहे. मग साजिदने विचारले की तुझी समस्या काय आहे. मोकळे हो आणि घरी आरामात बस. जर तुम्हाला मला बिकिनीमध्ये पहायचे असेल तर ठीक आहे. मी ते चित्रपटात घालेन. पण इथे मी कपडे काढून बसू शकत नाही. त्याने मला 50 कॉल केले असावेत. मात्र, मी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले.

साजिद खानवर यापुर्वी Me Too चा आरोप

साजिद खानवर असे आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापुर्वी बाॅलीवूडमध्ये झालेल्या Me Too चळवळीदरम्यान 2018 मध्ये त्याच्यावर आरोप झाला होता. चित्रपटसृष्टीतील अनेक महिलांनी साजिदवर गंभीर आरोप केले होते. त्याला काही काळ कामावरही बंदी घालण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात त्यांची नंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+