Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इरफान पठाणएवढीच हुशार आहे त्याची बायको सफा बेग; आपल्या सासऱ्याचीच घेतलीय मुलाखत, पहा व्हिडीओ

आयपीएल-२०२५ च्या हिंदी समालोचकांच्या यादीत नसल्यामुळे माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण चांगलाच चर्चेत आला. काही भारतीय खेळाडूंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे इरफानवर समालोचनाची बंदी घालण्यात आल्याचे बोलले जातेय. मात्र इरफानला समालोचकांच्या यादीत का ठेवले नाही, या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळू शकलेले नाही. परंतु गेल्या दोन दिवसांपासून इरफान जगभर चर्चेत आलाय. इरफान हा हुशार क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. मात्र इरफानपेक्षा त्याची पत्नी सफा बेगही काही कमी हुशार नाही, हे तुम्हाला सांगूनही खरे वाटणार नाही. तर आपण आज पत्नी सफा बेगबद्दल माहिती जाणून घेऊ....

Irfan Pathan s Wife Safa Beg

कशी सुरु झाली प्रेमकहाणी

इरफान पठाण वैयक्तीक आयुष्यात थोडासा लाजाळू आहे. त्यामुळे दोन वर्षे सुरु असलेली सफा आणि इरफानची प्रेमकहाणी जगासमोर लवकर आली नाही. २०२४ मध्ये दुबईतील एका कार्यक्रमात इरफानची सफासोबत ओळख झाली. पहिल्याच भेटीत या दोघांच्या तारा जुळल्या. तेथूनच यांची प्रेमकहाणी सुरु झाली. दोन वर्षे हे नाते दोघांनीही गुप्त ठेवले.

मक्का येथे केले लग्न

इरफान पठाणने ४ फेब्रुवारी २०१६ रोजी सौदी अरेबियातील मक्का येथे सफा बेगसोबत लग्न केले. त्यावेळी सफा फक्त २१ वर्षांची होती. लग्नात फक्त जवळचे नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. सफा आणि इरफान यांना इम्रान आणि सुलेमान अशी दोन मुले आहेत.

सफा आहे हुशार

सफा ही दिसायला जेवढी सुंदर आहे, तेवढीत ती हुशारही आहे. २८ फेब्रुवारी १९९४ मध्ये सौदी अरेबियातील जेद्दाह येथे तिचा जन्म झाला. ती मुळची हैदराबादी भारतीय वंशाची आहे. जेद्दाह येथील इंटरनॅशनल इंडियन स्कूलमध्ये तिने शिक्षण घेतले. रुढीवादी मुस्लिम परिवारातून ती आली असली तरी, ती व्यवसायाने एक माॅडेल व पत्रकार आहे. मुस्लिम समाजातील असूनही तिने माॅडेलिंगमध्ये भरपूर नाव कमावले आहे.

नेल आर्टीस्टही आहे सफा

सफाला इतर कलेतही रस आहे. अगदी लहान वयात तिने नखे रंगविण्याचे काम केले. तिने नेल आर्टीस्ट म्हणूही काम केले आहे. २०२४ मध्ये ती इंन्स्टाग्रामवर आली. सध्या तिचे २.६ लाखांपेक्षा जास्त फाँलोअर्स आहेत. आखाती देशातील अनेक मॅगेझीनमध्ये तिने माॅडेलिंग केले आहे. जेद्दाहमध्ये एका पीआर फर्ममध्ये ती कार्यकारी संपादकही होती.

सासऱ्याचीच घेतली मुलाखत

सफाने गेल्यावर्षी तिच्या इन्स्टाग्राम हॅण्डेलवर एक रिल शेअर केली. त्यात तिने सासरे महमूद खान पठाण यांची मुलाखत घेतली आहे. ती तिच्या सासऱ्यांनाच प्रश्न विचारताना दिसत आहे. या मुलाखतीत इरफान पठाणही आहे. इरफाननेही वडिलांना काही मजेशीर प्रश्न विचारले आहेत. या मुलाखतीला अनेकांनी लाईक केले आहे. तसेच सफाला काही यूजर्सने काही प्रश्नही विचारले आहेत. त्यात सफाने तिच्या जन्मस्थळाची माहितीही सांगितली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+