Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारतातील पहिल्या AI फिल्मचा ट्रेलर लॉंच; ना-हिरो-ना हिरोईन तरीही पाहता येईल रोमांचक प्रेमकहाणी

First indian ai film naisha trailer release : जगभरात चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन प्रयोग करून चित्रपटांची निर्मिती केली जाते. विविध विषय घेऊन ज्यामध्ये कधी एॅक्शन फिल्म तर काही चित्रपटात नुसताच मसाला असतो. अशातच आता भारा भारताच्या चित्रपटसृष्टीतील पहिला अनोखा चित्रपट येत आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटात ना अभिनेता आहे, ना अभिनेत्री केवळ तंत्रज्ञानाच्या आधारे रोमांन्स पाहता येणार आहे. होय, तुम्ही जे ऐकत आहात ते अगदी खर आहे. कारण भारतातील पहिल्या एआय चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. नुकताच, विवेक आंचलिया यांचा 'नैशा' या नवीनतम चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, या चित्रपटाची खासियत म्हणजे तो आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) वापरून बनवण्यात आला आहे.

Naisha Trailer

मे-2025 मध्ये होणार चित्रपट रिलीज

नैशा हा चित्रपट यावर्षी मे महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विवेक आंचलिया यांनी या चित्रपटाद्वारे लोकांसमोर काहीतरी वेगळे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. नैशा हा भारतातील पहिला भारतीय एआय चित्रपट असणार आहे.

दरम्यान, यापूर्वीही चित्रपटांमध्ये एआयचा वापर करण्यात आला आहे, ज्याचे उदाहरण म्हणजे गेल्या वर्षीचा इरा हा चित्रपट होय. परंतु, नैशा हा संपूर्ण चित्रपट एआय वापरून बनवण्यात आला आहे. हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित असणार आहे.

भारतातील पहिला एआय चित्रपट

चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे झाले तर, ही नैशा आणि जैनची कहाणी आहे. जरी अशा कथा अनेक वेळा पाहिल्या गेल्या आहेत, परंतु एआयमध्ये हे पूर्णपणे नवीन असणार. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की हा चित्रपट थिएटरमध्ये एक वेगळा अनुभव देणार आहे.

तथापि, अशा प्रकारे एआय द्वारे चित्रपट बनवण्यावरही बरेच लोक नाराज देखील आहेत. कारण ते म्हणतात की जर अशा प्रकारे एआय वापरून चित्रपट बनवले जाऊ लागले तर कलाकार आणि लेखकांसाठी भविष्य अडचणीचे ठरणार आहे.

चित्रपटाची अनुभूती मे महिन्यात अनुभवा

आता, मे महिन्यात 'नैशा' प्रदर्शित झाल्यानंतरच, एआय चित्रपटांचा अनुभव कसा असेल हे आपल्याला कळेल. तथापि, ट्रेलर पाहिल्यानंतर असे म्हणता येईल की मानवी भावना आणि तंत्रज्ञानाच्या भावनांमध्ये खूप फरक आहे. आता चित्रपटाला लोकांचा प्रतिसाद काहीही असो, पण तंत्रज्ञानाचा वापर खूप वेगळ्या पद्धतीने करण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+