विकी कौशलच्या 'छावा'च्या कमाईने तोडले विक्रम; गेला 'पुष्पा 2', 'पद्मावत', 'तानाजी'च्याही पुढे!
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलच्या छावा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे अनेक विक्रम तोडले आहेत. 'छावा'च्या टीझर आणि ट्रेलरमधून हा चित्रपट पहिल्या दिवशी 15 -20 कोटींची कमाई करेल, असे सांगितले जात होते. परंतु 14 फेब्रुवारीला थिएटरमध्ये दाखल झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 33.10 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 39.30 कोटी आणि रविवारी म्हणजेच 16 फेब्रुवारीला या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 49.03 कोटींची भर पडली. पहिल्या वीकेंडला चित्रपटाची कमाई 121.43 कोटींवर पोहोचली आहे.

'छावा' महाराष्ट्रात दमदार
'छावा'चा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रात होत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. रविवारपर्यंत उत्तर भारतातही या चित्रपटाने चाहत्यांना भुरळ घातल्याचे सांगितले जाते. या चित्रपटाने एकाच दिवशी सर्वाधिक कमाई केली आहे. चित्रपटाची अशीच कमाई सुरू राहते की नाही हे सोमवारच्या चाचणीत कळेल. 'छावा'ने पहिल्या सोमवारी चांगली कमाई केली. तर पुढचे काही आठवडे तो थांबणार नसल्याचे चित्रपट समिक्षकांना वाटते. त्यातच 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीच्या दिवशीही हा चित्रपट चांगली कमाई करेल, असा अंदाज बांधला जात आहे.
तोडले अनेक विक्रम
आत्तापर्यंत पद्मावत या ऐतिहासीक चित्रपटाच्या नावावर कमाईचा विक्रम होता. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 114 कोटी तर कलेक्शनमध्ये 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. त्या तुलनेत छावाने पहिल्या तीन दिवसांतच 121 कोटी कमावले आहेत. तानाजीलाही त्याने मागे टाकले आहे. विकी कौशलच्या चित्रपटाने मुव्ही मॅक्स चेनवर अल्लू अर्जुनच्या पुष्पा- 2 ला मागे टाकले आहे. 'छावा'ने पहिल्या रविवारी 2.04 कोटी रुपयांची कमाई केली. तर 'पुष्पा 2' च्या हिंदी आवृत्तीने पहिल्या रविवारी इथून 2.01 कोटी रुपये कमावले होते.
ठरणार पहिला ब्लाँकबस्टर
छावाने पहिल्या रविवारी 49 कोटी कमावले. यावर्षी एकाच दिवसात एवढे कलेक्शन आणणारा तो पहिलाच चित्रपट ठरला आहे. यावर्षी अक्षय कुमारच्या स्काय फोर्सने बाँक्स ऑफिसवर 130 कोटी कमावले होते. त्याचे विकेंड कलेक्शन 73 कोटी होते. एवढे पैसे छावाने पहिल्या तीन दिवसांतच कमावले आहेत. छावा इतर अनेक चित्रपटांनाही मागे टाकील, असा अंदाज बांधला जात आहे.












Click it and Unblock the Notifications