Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'लापता लेडीज' ऑस्कर जिंकल्यास काय मिळेल? ट्रॉफीसोबत किती कोटी रुपयांचे गिफ्ट मिळेल?

Laapataa Ladies Oscars 2025: बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची पूर्वीची पत्नी किरण राव निर्मित 'लापता लेडीज' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.'लापता लेडीज' या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार 2025 साठी नामांकन मिळालं आहे.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई केली नसली तरी प्रेक्षकांच्या हृदयात या चित्रपटाने एक खास स्थान निर्माण केले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होताच सर्वांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले.

'लापता लेडीज' चित्रपटासाठी ऑस्कर नामांकन

या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक किरण राव यांनी त्यातील सर्व पात्रे अतिशय साधेपणाने दाखवली आहेत.पण ही कथा अतिशय दमदार आहे. जी थेट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडते. या चित्रपटाला ऑस्कर अवॉर्ड मिळाल्यास काय मिळणार ते जाणून घेऊया.

laapataa Ladies

दरम्यान 'लापता लेडीज' या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार 2025 साठी नामांकन मिळाले आहे. ही बातमी समोर आल्यापासून चित्रपट आणि त्यातील भूमिकाबाबत विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत.

'लापता लेडीज' चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला तर काय मिळणार?

-'लापता लेडीज'ला 'ऑस्कर अवॉर्ड' मिळाला तर एक म्हणून ट्रॉफी पुरस्कार म्हणून मिळेल. ही सामान्य ट्रॉफी नसून ती ब्राँझची आहे. यात 24 कॅरेट सोन्याचा आर्क असतो. ही ट्रॉफी बनवण्यासाठी 1000 डॉलर्स म्हणजेच 83 हजार रुपये खर्च येतो.

-एक गुडी बॅग देखील असेल, जी विजेत्याला दिली जाते. ही बॅग केवळ विजेत्यालाच नाही तर इतर नामांकित व्यक्तींनाही दिली जाते. यात एक खास भेट असते. या गुडी बॅगमध्ये 50 हून अधिक भेटवस्तू असतात. त्यांची किंमत खूप जास्त आहे.

- मीडिया रिपोर्ट्सनुसार गेल्या वर्षी दिलेल्या बॅगमध्ये सुमारे 1.4 कोटी रुपयांच्या भेटवस्तू होत्या.

'लापता लेडीज' चित्रपटाचे एकूण बजेट

'लापता लेडीज'ने 2025 चा ऑस्कर अवॉर्ड जिंकला तर ट्रॉफी आणि भेटवस्तूंनी भरलेली बॅग मिळणार हे उघड आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'लापता लेडीज' हा चित्रपट 5 कोटींच्या बजेटमध्ये बनला असून या चित्रपटाने 25 कोटींहून अधिक कमाई केली आहे. याशिवाय हा चित्रपट OTT वर सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट देखील ठरला आहे. या चित्रपटाचे निर्माते आमिर खान आणि त्याची पूर्वीची पत्नी किरण राव आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+