Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ऋतिक- सुझानपासून ते अमीर- रिनापर्यंत... वाचा, बाँलिवूडमधले 7 सर्वात महागडे घटस्फोट

प्रसिद्ध अभिनेता गोविंदा हा आपला ३७ वर्षांचा संसार मोडणार असल्याच्या बातम्या सुरु झाल्या आहेत. गोविंदा हा पत्नी सुनीतापासून वेगळे झाला, तर तो बाँलिवूडमधला आणखी एक हाय-प्रोफाईल काडीमोड ठरेल. बाँलिवूडमधल्या अनेक जोडप्यांचे घटस्फोट हे खूप महागडे ठरले आहेत. हे घटस्फोट केवळ बातम्यांमध्येच येतात असे नाही तर जोडप्यांसाठी खूप महागडे ठरतात. हे सेलिब्रिटी महागडे घटस्फोट घेतात जिथे त्यांना त्यांच्या जोडीदाराला पोटगी म्हणून कोट्यवधी रुपये द्यावे लागतात. आता त्यात गोविंदाचीही भर पडेल, असे बोलले जात आहे. बाँलिवूडमध्ये कुणाचे घटस्फोट महागडे ठरलेत..? अशाच सात महागड्या जोडप्यांची आज आपण माहिती घेऊ...

Most Expensive Divorce

१. हृतिक- सुझान

हृतिक रोशन आणि सुझान खान यांचे वैवाहिक आयुष्य एकदम छान सुरु होते. पहिल्या नजरेत प्रेम, लग्न आणि दोन मुलांना जन्म, असं सगळं अगदी चित्रपटातील कथेप्रमाणे झालं होतं. सर्वांच्या नजरेत भरेल, एवढं सुंदर हे जोडपं होतं. पण १४ वर्षे एकत्र राहिल्यानंतर २०१३ मध्ये दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. विशेष म्हणजे सुझान खानने घटस्फोटासाठी पोटगी म्हणून ४०० कोटी रुपये मागितले होते. यासोबतच, हृतिक रोशनने नंतर ३८० कोटी रुपये दिल्याची बातमीही आली.

Most Expensive Divorce

२. प्रभु देवा- रामलता

प्रभु देवा या दाक्षिणात्य दिग्दर्शक अभिनेत्याला बाँलिवूडमध्ये कुणी ओळखत नाही, असे नाही. केवळ दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्याने चांगले नाव कमावले आहे. प्रभु देवा हा २०११ मध्ये त्यांची पत्नी रामलतापासून वेगळा झाला. अहवालानुसार, प्रभुदेवाने रामलता यांना २० ते २५ कोटी रुपयांची मालमत्ता, दोन महागड्या गाड्या आणि १० लाख रुपये दिले होते. हे घटस्फोटाच्या तडजोडीचे पैसे होते, असे सांगितले गेले.

Most Expensive Divorce

३. सैफ अली खान- अमृता सिंग

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचे लग्न जसे त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होते, तसेच त्यांच्या घटस्फोटही धक्कादायकच होता. पती-पत्नी म्हणून १२ वर्ष सोबत राहिल्यानंतर या दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटासाठी अमृताला सैफच्या संपत्तीचा अर्धा भाग, ५ कोटी रुपये आणि १८ वर्षांसाठी त्यांच्या मुलांचा खर्च उचलण्यासाठी पैसे द्यावे लागल्याचे स्वतः सैफने एका मुलाखतीत सांगितले.

Most Expensive Divorce

४. संजय दत्त- रिया पिल्लई

बाँलिवूडचा खलनायक अर्थात संजय दत्त याचंही आयुष्य अनेकदा चढउताराचं राहिलं आहे. १९९८ मध्ये संजय दत्त आणि रिया पिल्लई यांचा घटस्फोट त्या काळातला सर्वात महागडा घटस्फोट ठरला होता. संजय दत्तने रिया पिल्लईला ८ कोटी रुपये आणि एक महागडी गाडी दिली होती. शिवाय लियांडर पेसच्या मुलाची आई होण्यापर्यंत संजय दत्तने रियाचा सगळा खर्चही उचलला होता.

Most Expensive Divorce

५. फरहान अख्तर- अधुना भबानी

फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना यांचा १६ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतरचा घटस्फोटही चांगलाच चर्चेत आला होता. घटस्फोटासाठी अधुनाला फरहान अख्तरकडून पोटगी तर मिळालीच पण मुंबईतील सर्वात महागड्या बँडस्टँड भागात असलेला कोट्यवधींचा बंगलाही मिळाला.

Most Expensive Divorce

६. करिश्मा कपूर- संजय कपूर

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा घटस्फोटही खूप महागात ठरला होता. घटस्फोटानंतर करिश्माला खूप काही मिळाले. एका अहवालानुसार, करिश्माला पोटगी म्हणून ७० कोटी रुपये आणि मुंबईत एक आलिशान बंगला मिळाला होता.

Most Expensive Divorce

७. आमिर खान- रीना दत्ता

आमिर खान आणि रीना दत्ता यांनी त्यांच्या पालकांच्या मर्जीविरुद्ध लग्न केले होते. हे लग्न जास्त काळ टिकले नाही. ब्रिटिश पत्रकार जेसिका हाइन्ससोबत असलेल्या अमिरच्या अफेअरची चर्चा रंगली आणि त्यांच्यात घटस्फोट झाला. या घटस्फोटासाठी अमिरलाही कोट्यवधी रुपये द्यावे लागले. परंतु ती रक्कम सार्वजनिक करण्यात आली नाही. तरीही, हा घटस्फोट बॉलिवूडमधील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक मानला जातो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+